मायक्रोसॉफ्ट कंपनी १० जानेवारी पासून विंडोज ७आणि विंडोज ८.१ चे सिक्युरिटी अपडेट्स आणि टेक्निकल सपोर्ट बंद करणार आहे. ही घोषणा मायक्रोसॉफ्ट एजने केली आहे. ब्राउझर या डिव्हाइसवर काम करणे सुरु ठेवेल पण यांना कोणतेही नवीन सिक्युरिटी अपडेट आणि फीचर्स देण्यात येणार नाहीत. WebView2 हे एक साधन आहे ते डेव्हलपर्सना वेबवरील आधारित कंटेंट ऍड करण्याची अनुमती देते.

Windows 7 आणि Windows 8.1सोडूनदेणारे एज हे प्रमुख सर्च इंजिन नाही. विंडोज ७ आणि विंडोज ८.१ साठीचा क्रोम सपोर्ट ७ फेब्रुवारी संपेल असे google ने आक्टोबरमध्ये जाहीर केले होते. Windows 8.1 किंवा Windows 7 चालवणारी डिव्हाइसेस बग्स, मालवेअर हे असुरक्षित होऊ शकतात.

हेही वाचा : Redmi Note 12 सिरीज झाली भारतात लाँच; पावरफुल कॅमेरासहित ‘हे’ मिळणार तगडे फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने वापरकर्त्यांना डिव्हाईस अपग्रेड करण्यासाठी किंवा ऑपरेटिंग सिस्टीम आणि ब्राउझर वापरण्यासंदर्भात डेडलाईन दिली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये केलेल्या लॅन्सवीपर सर्वेक्षणात असे आढळून आले की विंडोज ११ पेक्षा जास्त पीसी विंडोज एक्सपी, ७ किंवा ८ वर चालू आहेत. मायक्रोसॉफ्टने २०२० मध्ये विंडोज ७ चा सपोर्ट बंद करण्याची चेतावणी वापरकर्त्यांना दिली होती. ज्यांनी अतिरिक्त तीन वर्षांचे पैसे दिले आहेत त्यांनाच सिक्युरिटी अपडेट येणार आहेत.