scorecardresearch

Microsoft News: व्यवसायात भरभराट होण्यासाठी मायक्रोसॅाफ्टचे AI Tool करणार मदत; नक्की कसे ते जाणून घ्या

AI चा वापर आता विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

Microsoft News: व्यवसायात भरभराट होण्यासाठी मायक्रोसॅाफ्टचे AI Tool करणार मदत; नक्की कसे ते जाणून घ्या
मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स ३६५ कोपायलट (Image Credit- Microsoft.com)

OpenAI कंपनीने आपला chatgpt हा chatbot लॉन्च केल्यापासून जगातील अनेक कंपन्या आपले स्वतःचे AI तयार करण्यासाठी काम करत आहेत. AI चा वापर आता विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या स्पर्धेमध्ये Microsoft या टेक कंपनीने Microsoft Dynamics 365 Copilot लॉन्च केले आहे.

AI वर लक्ष केंद्रित करतेय मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्टने Bing Edge आणि टीम्स सारखे आपले AI टेक्नॉलॉजी सादर केली आहे. आता मायक्रोसॉफ्टने आपले लक्ष व्यावसायिक टेक्नॉलॉजीकडे केंद्रित केले आहे. या आधीच सर्च इंजिन Bing आणि web browser edge यासारखे AI chatbot लॉन्च केले आहेत. अमेरिकेमधील टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने अनेक वेळा आहे स्पष्ट केले आहे की, त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये AI टेक्नॉलॉजी लागू करणार आहे. कंपनीने यासाठी याआधीच OpenAI मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा : नव्या रंगामध्ये धुमाकूळ घालणार Apple चे ‘हे’ आयफोन्स, जाणून घ्या कधीपासून खरेदी करता येणार

काय आहे Dynamics 365 Copilot ?

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मते, कोपायलट टूल हे विविध व्यावसायिक कामांसाठी नेक्स्ट जनरेशनमधील AI ची क्षमता आणि प्राकृतिक भाषेचा वापर करतो. विक्री,सेवा, सप्लाय काहीही असो यामध्ये कोपायलट व्यावसायिकांसोबत काम करणार आहे. तसेच त्यांना नवीन संकल्पना तयार करण्यासाठी मदत करेल. आपल्या पोस्टमध्ये नवीन कोपायलटची घोषणा करताना मायक्रोसॉफ्टने आपल्या सर्व्हेचा दाखला दिला ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, १० पैकी ९ कमर्चाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये पुनरावृत्ती होणारी कामे टाळण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे Dynamics 365 हे एआय टूल विक्री आणि ग्राहक सेवेशी संबंधित काही नियमित कामे स्वतः करते. याशिवाय डायनॅमिक्स 365 हे Sales आणि Viva Sales मध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे. यामध्ये वापरकर्ता कस्टरला मेल ड्राफ्ट करतो आणि Outlook मध्ये टीम मिटिंगचे ईमेल तयार करतो. ग्राहकांच्या मदतीसाठी डायनॅमिक्स 365 कोपायलट टूल चॅटमध्ये प्रासंगिक प्रतिक्रियांचा मसुदा तयार करण्यास मदत करते. याशिवाय याच्या मदतीने ईमेल एन्क्वायरी आणि mutual knowledge चॅटची सुविधा मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 11:31 IST
ताज्या बातम्या