scorecardresearch

नव्या रंगामध्ये धुमाकूळ घालणार Apple चे ‘हे’ आयफोन्स, जाणून घ्या कधीपासून खरेदी करता येणार

Apple कंपनीने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 14 सिरीज लॉन्च केली होती.

iphone 14 and iphone 14 plus launch yellow colour
आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस नवीन रंगात -(Image Credit- Apple)

Apple कंपनीने आपल्या नवीन iPhone सिरीजमधील Phone 14 आणि iPhone 14 Plus हे नवीन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहेत. या नवीन बदलामुळे वापरकर्ते आता पाच रंगांमध्ये आयफोन खरेदी करू शकणार आहेत. आयफोन सिरीज १४ च्या या दोन स्मार्टफोन्समध्येच कंपनीने बदल केले आहेत. कंपनीने iPhone 14 आणि iPhone 14 Plus हे दोन्ही स्मार्टफोन्स Yellow रंगामध्ये लॉन्च केले आहेत. या आधी वापरकर्ते Blue, Midnight, Purple, Starlight आणि Product Red या रंगांमध्ये आयफोन खरेदी करू शकत होते.

Apple कंपनीने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 14 सिरीज लॉन्च केली होती. iPhone 14 आणि iPhone 14 Plus हे मॉडेल कंपनीने नवीन रंगात लॉन्च केले आहेत. तसेच कंपनीने या व्यतिरिक्त स्मार्टफोन्सच्या फीचर्समध्ये किंवा अपडेटमध्ये कोणताही नवीन बदल केलेला नाही.

हेही वाचा : Headphones आणि Earphones मध्ये काय फरक आहे माहितेय का? जाणून घ्या एका क्लिकवर

आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस हे स्मार्टफोन्स आता पिवळ्या रंगात वापरकर्त्यांना खरेदी करता येणार आहे. आयफोन १४ आणि १४ प्लस हे स्मार्टफोन्समध्ये १२८ , २५६ आणि ५१२ जीबी इतके इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते. आयफोन १४ ची सुरुवातीची किंमत ही ७९,९०० रुपये इतकी आहे. तर आयफोन १४ प्लसची सुरुवातीची किंमत ही ८९,९०० इतकी आहे. नवीन रंगामधील हे स्मार्टफोन्स तुम्हाला १० मार्चपासून प्री-ऑर्डर करता येणार आहे व १४ मार्चपासून त्याची खरेदी करता येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 09:20 IST