व्हिडिओसाठी असलेले प्लॅटफॉर्म म्हणजे YouTube. युट्युब चॅनलद्वारे आपण पैसे कमावू शकतो. मात्र त्यासाठीची यूट्यूबचे नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात. मात्र याच युट्युबवर टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देखील पैसे मिळविणे शक्य होणार आहे. १ फेब्रुवारी २०२३ पासून पैसे मिळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असे यूट्यूब कंपनीने सांगितले.
युट्युबवर शॉर्ट व्हिडीओ मधून पैसे मिळविण्यासाठी वापरकर्त्यांना शॉर्ट जाहिरात कमाईच्या नियम व अटींचा फॉर्म भरावा लागेल.सर्व युट्युब भागीदारांना या प्रोग्रॅमच्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत. हा फॉर्म भरल्याशिवाय तुम्ही शॉर्ट व्हिडिओमधून कमाई करू शकणार नाही. हा फॉर्म १० जुलै पर्यंत भरणे आवश्यक आहे. युट्युब वरील व्हिडिओप्रमाणेच शॉर्ट व्हिडिओंसाठी पैसे मिळवण्याची प्रक्रिया असणार आहे. कमाईचे सूत्र हे तीन गोष्टींवर ठरणार आहे. लोकांची संख्या, व्हिडीओ पाहण्याची वेळ , ब्रँडची जाहिरात या तीन गोष्टींवरून कमाईचे सूत्र ठरणार आहे.
या व्हिडिओमधून पैसे मिळवण्यासाठी कंपनीने काही पात्रता आणि टक्केवारी देखील निश्चित केली आहे. यासाठी १००० सबस्क्रायबर्स आणि ४ हजार तास इतकी वेळ कंपनीने निश्चित केली आहे. ज्यांचे तीन महिन्यात व्हीव्हर्स १ कोटी आहेत ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत. यात ४५ टक्के क्रिएटर्सना आणि ५५ टक्के युट्युबला मिळणार आहेत.