IND vs BAN ODI, फिफा विश्वचषक पाहण्याच्या निमित्ताने अलीकडे अनेकदा इंटरनेट पॅक वेळेच्या आधीच संपतोय का? मॅच चांगल्या इंटरेस्टिंग वळणावर आलेली असताना अचानक अडथळा आला की काय करू आणि काय नको अशी परिस्थिती तुमचीही होत असेल ना? मग या सगळ्या प्रश्नावर रिलायन्स जिओने एक भन्नाट प्लॅन आणला आहे. खास FIFA विश्वचषकासाठी रिलायन्सने आपला ३०१ रुपयांचा प्लॅन हा कमी किमतीत ऑफर केला आहे. तसेच या प्लॅनचा वापर करून मूळ रिचार्ज प्लॅनसहित अधिक वेगवान 4G इंटरनेटचा फायदा घेऊ शकता. नेमका काय आहे प्लॅन, चला तर जाणून घेऊयात…

काय आहे रिलायन्स जिओ प्लॅन?

जिओने आपला ३०१ रुपयांचा प्लॅन २२२ रुपयात उपलब्ध करू दिला आहे. ३० दिवसांच्या वैधतेसह ५० जीबी 4G इंटरनेटसह हा प्लॅन येतो. रिलायन्स जिओच्या या भन्नाट प्लॅनसह नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार सहित Sony Liv सारखे ऍप आपल्याला 4K रिझोल्यूशनसहित व्हिडीओचा आनंद घेऊ देतात. हा प्लॅन आपण आपल्या स्मार्टफोनवर तर वापरू शकताच पण त्यासह लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीला हॉटस्पॉट जोडूनही इंटरनेट वापरता येते.

LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
preventive chemotherapy
कोण घेतंय ‘ही’ केमोथेरपी? ठरणार का ती कर्करुग्णांसाठी वरदान? तज्ज्ञ काय सांगतात?

कसा वापराल रिलायन्सचा २२२ रुपयांचा प्लॅन?

जिओचा फिफा वर्ल्ड कप रिचार्ज प्लॅन वापरण्यासाठी वापरकर्त्याकडे बेस प्लॅन असणे आवश्यक आहे आणि बेस प्लॅनवर उपलब्ध असलेल्या 4G डेटाची दैनिक मर्यादा संपल्यानंतरच या प्लॅनमधील डेटा वापरता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या जिओ सिमवर २९९ रुपयांचा रिचार्ज केला असेल, तर तुम्ही बेस प्लानमधून 2GB डेटा पूर्ण वापरल्यानंतर हा अतिरिक्त 50GB डेटा वापरू शकता.

हे ही वाचा<< 12,500 रुपयात मिळतोय 44 हजारांचा Google Pixel 6a! फ्लिपकार्टच्या ऑफरचा कसा फायदा घ्याल?

फुटबॉलप्रेमींसाठी खास तयार करण्यात आलेल्या या जिओ प्लॅनमध्य कोणत्याही डेटा कॅपशिवाय संपूर्ण 50GB डेटा ऑफर केलाजातो. ज्यांना इंटरनेटवरून मोठ्या फाइल्स डाउनलोड करायच्या असतील किंवा वीकेंडला सिरीज पाहायच्या असतील त्यांना हा प्लॅन अगदी फायद्याचा ठरू शकतो.