अ‍ॅपल (Apple) ही सुरुवातीपासूनचं महाग प्रोडक्ट्स असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे स्मार्टफोन, लॅपटॉप वापरणे हे भारतात एक स्टेटस सिंबल मानले जाते. भारतात Apple प्रोडक्टची वाढती मागणी पाहता मुंबई आणि दिल्लीमध्ये कंपनीने आपले अलिशान स्टोर्स सुरु केले आहे. Apple कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांनाही त्याच तोडीचा पगार देते. पण Apple Store मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा नेमका किती पगार देते हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना. यामुळे भारतात या कंपनीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नेमका पगार किती आणि त्यांचे शिक्षण किती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात अ‍ॅपलचे दोन भव्य स्टोअर सुरु झाले आहेत. मुंबई आणि दिल्ली शहरात ओपन झालेल्या स्टोअरसाठी कंपनी लाखोंचे भाडे देत आहे. अ‍ॅपलचे भारतातील पहिले स्टोअर हे मुंबईतील जिओ वर्ल्ड मॉलमध्ये सुरु झाले तर दुसरे दिल्लील साकेतमध्ये सुरु झाले. या स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी कुण्या सामान्य दुकानात किंवा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसारखे नाहीत. त्यांचा पगार आणि शिक्षण हे दोन्ही एकदम हायक्लास आहे.

देशातील दुसरे Apple चे रिटेल स्टोअर ‘या’ शहरात होणार सुरू; ७० सदस्यांची टीम १५ भाषांमध्ये संवाद साधणार

Apple Store मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण किती?

अ‍ॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स सारख्या डिग्री आहेत,असे एका अहवालातून समोर आले आहे. यातील काही कर्मचारी हे परदेशातील विद्यापीठांमधून डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेऊन आलेले आहेत. तर काही कर्मचाऱ्यांना युरोपियन देशांमधून आणण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना येतात २५ हून अधिक भाषा

Apple ने भारतातील या दोन स्टोअरमध्ये जवळपास १७० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भारतातील Apple Store मध्ये काम करणारे कर्मचारी केवळ पदवीच्या बाबतीतच पुढे नाहीत, तर त्यांना भाषांचेही उत्तम ज्ञान आहे. मुंबईतील Apple Store मध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना २५ हून अधिक भाषा येतात, तर दिल्लीतील स्टोअरमध्ये कर्मचारी १५ वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि समजतात.

Apple Store मधील कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो.

अ‍ॅपल भारतातील कंपनीच्या स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पगात देत आहे, याबाबत कंपनीकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅपल भारतातील स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान एक लाख रुपये देते. म्हणजेच जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना किमान १२ लाखांचे वर्षाचे पॅकेज मिळते.

कर्मचाऱ्यांना मिळतात हे फायदे

अ‍ॅपल कर्मचाऱ्यांना चांगले वेतन पॅकेज तसेच वैद्यकीय योजना, आरोग्य लाभ, कुटुंबासाठी स्वतंत्र योजना, शैक्षणिक अभ्यासक्रम योजना तसेच अ‍ॅपल प्रोडक्ट खरेदी करण्यावर भरघोस सवलत देते.

अ‍ॅपल स्टोअरसाठी देते लाखो भाडे

अ‍ॅपल देखील भारतात उघडलेल्या त्यांच्या दोन्ही स्टोअरवर खूप पैसे खर्च करत आहे. कंपनी दरमहा लाखो रुपये भाडे देते. मुंबईतील खुल्या अ‍ॅपल स्टोअरसाठी कंपनी दरमहा ४२ लाख रुपये देते तर दिल्लीतील स्टोअरसाठी ४० लाख रुपये भाडे देते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai delhi apple store employees will get more than 1 lakh salary monthly know monthly rent of india apple store sjr
First published on: 23-04-2023 at 14:15 IST