Nokia 2780 Flip फोन जागतिक बाजारात लॉन्च झाला आहे. हा एचएमडी ग्लोबलचा(HMD Global) नवीनतम फीचर फ्लिप फोन आहे. हा डिवाइस नोकिया 2760 फ्लिप सारखाच आहे ज्याची घोषणा या वर्षी मार्चमध्ये करण्यात आली होती. फोनला मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा मिळत आहे. चला जाणून घेऊ Nokia 2780 Flip ची किंमत आणि उत्तम फीचर्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकिया 2780 फ्लिपची भारतातील किंमत

Nokia 2780 Flip ची किंमत $80 म्हणजे अंदाजे ६७०० रुपये आहे आणि हा फोन लाल आणि निळ्या रंगाच्या पर्यायासह सादर केला आहे. या फोनची १५ नोव्हेंबरपासून अमेरिकेत विक्री सुरू होईल.

( हे ही वाचा:Spotify ची जबरदस्त ऑफर: प्रीमियम सदस्यता भारतात सहा महिन्यांसाठी मोफत उपलब्ध!)

नोकिया 2780 फ्लिप तपशील

Nokia 2780 Flip मध्ये २.७ इंचाचा TFT डिस्प्ले आणि बाहेरील बाजूस १.७७ इंचाचा सेकंडरी डिस्प्ले आहे. हा फोन वेळ, कॉलर आयडी आणि इतर अपडेट दाखविण्यास सक्षम आहे. सेकंडरी स्क्रीनच्या वर LED फ्लॅशसह ५एमपी कॅमेरा सेन्सर देखील आहे. फिचर फ्लिप फोनमध्ये क्लॅमशेल डिझाइन आणि T9 कीबोर्ड आहे.

नोकिया 2780 फ्लिप बॅटरी

नोकिया 2780 फ्लिप क्वालकॉम २१५ प्रोसेसरसह सुसज्ज आहे ज्यामध्ये १.३ GHz वर क्लॉक केलेला क्वाड-कोर CPU आणि १५०Mbps च्या पीक डाउनलिंक स्पीडसह X5 LTE मॉडेम समाविष्ट आहे. स्मूथ स्टोरेजसाठी ४जीबी रॅम आणि ५१२एमबी स्टोरेज आहे आहे. या फोनमध्ये १४५०mAh बॅटरी देण्यात आली आहे.

( हे ही वाचा: Telegram वर मेसेज शेड्युल करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या स्टेप्स)

नोकिया 2780 फ्लिप वैशिष्ट्ये

सॉफ्टवेअरच्या बाबतीत, नोकिया 2780 फ्लिप बॉक्सच्या बाहेर KaiOS ३.१ वर चालतो. यामध्ये Google नकाशे, YouTube आणि एक वेब ब्राउझर देखील आहे. फीचर फोन वायफाय, एमपी3 आणि एफएम रेडिओसह येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia 2780 flip budget phone launch know its price and specification gps
First published on: 04-11-2022 at 21:52 IST