तुम्हालाही नथिंग फोन १ [Nothing Phone (1)] खरेदी करायचा आहे का? तर आज तुमच्याकडे संधी आहे. हा स्मार्टफोन आज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून हा फोन फ्लिपकार्ट या ई कॉमर्स साइटवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
नथिंग फोन १ मध्ये ६.५५ इंच फुल एचडी + ओएलईडी स्क्रीन आहे. हा फोन गोरिल्ला ग्लास ५ संरक्षणासह येतो. तसेच ते मिड-रेंज ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८+ वापरते. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेल आहे. यासोबत आणखी ५० मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. त्याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५००एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की बॅटरी ३० मिनिटांत ५०% पर्यंत चार्ज होऊ शकते. यामध्ये एक युनिक पारदर्शक डिझाइन आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८+ प्रोसेसरसह येतो. अलीकडेच कंपनीने या फोनची किंमत वाढवली होती. आता त्याची किंमत कमी करण्यात आली असून या स्मार्टफोनची नवी किंमत ३३,९९९ पासून सुरु होते.
ही किंमत त्याच्या ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मॉडेलसाठी आहे. दुसऱ्या वेरिएंटमध्ये ८जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. त्याची किंमत ३७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजदेखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. त्याची किंमत ३९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
