Digilocker on Whatsapp : इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. मंत्रालयाने जाहीर केले की डिजीलॉकर सेवेत प्रवेश करण्यासाठी नागरिक आता व्हॉट्सअ‍ॅपवरील MyGov हेल्पडेस्कमध्ये प्रवेश करू शकतील. तुम्हाला पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती नेहमी तुमच्याजवळ ठेवायची नसतील, तर हे नवीन फीचर अतिशय उपयुक्त आहे.

यामध्ये वापरकर्त्यांचे डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणिकरण करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे डाउनलोड करणे, इतर सर्व सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर दिल्या जातील.

WhatsApp Web युजर्सनी ‘या’ कमांड्स नक्की लक्षात ठेवाव्या; झटपट होतील सर्व कामे

व्हॉट्सअ‍ॅपवर MyGov हेल्पडेस्कची सुविधा हे लोकांच्या सोयीसाठी एक मोठे पाऊल आहे. MyGov हेल्पडेस्क आता डिजीलॉकर सेवेद्वारे घरी बसलेल्या लोकांना अनेक सुविधा पुरवणार आहे. आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे येथून त्वरित डाउनलोड केली जाऊ शकतात. यासोबतच लोकांना अडचणीच्या वेळीही या सुविधेचा वापर करता येणार आहे.

या अंतर्गत, लोक पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सीबीएसई इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), दहावीची मार्कशीट, बारावीची मार्कशीट, विमा पॉलिसीची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे ठेवू शकतील.

देशभरातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्स व्हॉट्सअ‍ॅप नंबर +९१ ९०१३१५१५१५ वर ‘हॅलो किंवा हाय किंवा डिजीलॉकर’ असा संदेश पाठवून चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर डिजीलॉकर सारखे वैशिष्ट्य, MyGov चॅटबॉट हे नागरिकांना संसाधने आणि अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

Whatsapp ग्रुप सोडल्यावर फक्त अ‍ॅडमिनलाच जाणार नोटीफिकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च २०२० मध्ये कोविडच्या काळात, पूर्वी MyGov कोरोना हेल्पडेस्क म्हणून ओळखले जाणारे व्हॉट्सअ‍ॅपवर MyGov हेल्पडेस्क लोकांना कोविडशी संबंधित माहिती देत ​​असे. यासोबतच लसीचे प्रमाणपत्र बुक करून डाउनलोड करण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. आजपर्यंत, ८० दशलक्षाहून अधिक लोक हेल्पडेस्कवर पोहोचले आहेत, ३३ दशलक्षाहून अधिक लस प्रमाणपत्रे डाउनलोड केली गेली आहेत आणि देशभरात लाखो लसीकरण भेटी बुक केल्या गेल्या आहेत.