देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. अशा परिस्थितीत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) रिटेल डिजिटल पेमेंटसाठी बँकांना विशेष सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत, आता UPI एक्टिवेट करण्यासाठी, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइलवर आधार कार्ड प्रमाणीकरण आणि OTP आवश्यक असेल. तर यापूर्वी UPI एक्टिवेट करण्यासाठी डेबिट कार्ड आवश्यक होते.

आता डेबिट कार्ड क्रमांक देण्याची गरज नाही. यात अधिकाधिक लोक सामील होतील आणि डिजिटल पेमेंटमध्ये वाढ होईल, असा विश्वास आहे. NPCI ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे परिपत्रक जारी केले होते आणि बँकांना १५ डिसेंबर २०२१ पर्यंत परिपत्रकाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले होते, जे नंतर १५ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आले. त्याचवेळी, ते सादर करण्यासाठी ९ ते १२ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

जर UPI एक्टिवेट असेल तर ही प्रक्रिया करावी लागणार नाही
या व्यवस्थेअंतर्गत बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. जर बँक आधारशी लिंक नसेल, तर UPI एक्टिवेट करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. दुसरीकडे, जर तुमचा UPI आधीच एक्टिवेट असेल, तर त्याला आधार पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.

आणखी वाचा : उन्हाळ्यात AC घ्यायचा विचार करताय ? ४०० रूपयांमध्ये मिळतोय हा Mini Portable AC

नोंदणी फक्त OTP द्वारे केली जाईल
तुम्ही फक्त आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाच्या मदतीने UPI मध्ये नोंदणी करू शकाल. यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. लिंक केल्यानंतरच तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP पाठवला जाईल. लिंक नसल्यास तुम्ही ३१ मार्च २०२२ पूर्वी ते पूर्ण करून घ्यावे.

आणखी वाचा : या फीचरमुळे Instagram Reels तयार करणे सोपे होईल, फॉलोअर्स वाढविण्यातही मदत होईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजूनही इतक्या लोकांकडे डेबिट कार्ड नाही
जानेवारी २०२२ पर्यंत देशात ९४० दशलक्ष डेबिट कार्ड आहेत. तसंच, प्रधानमंत्री जन योजनेच्या आकडेवारीनुसार, योजनेंतर्गत बँक खाते उघडलेल्या ४४८.२ दशलक्ष ग्राहकांपैकी केवळ ३१४.६ दशलक्ष डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत, जे असे दर्शविते की, असे अनेक ग्राहक आहेत ज्यांचे बँक खाते आहे, परंतु त्यांच्याकडे प्रत्यक्षात बॅंक खाते नाही. याच कारणामुळे डेबिट कार्ड त्यांच्या UPI पर्यंत पोहचू शकलेलं नाही.