Oneplus ही एक टेक कंपनी आहे. ही कंपनी मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही असे प्रॉडक्टचे उत्पादन करते असते. याच कंपनीने मंगळवारी आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही OnePlus TV 65 Q2 Proलाँच करण्याची घोषणा केली आहे. २०१९ साली वन प्लसने OnePlus TV Q1 आणि Q1 Pro हे मॉडेल लाँच केले होते. आता नवीन लाँच होणारे मॉडेल याच्याशी संबंधित असणार आहे. हे डिव्हाईस लाँच झाले की, ग्राहकांसाठी भारतातील सर्व ऑफलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध केले जाणारआहे. OnePlus TV 65 Q2 Pro हा स्मार्ट टीव्ही ७ फेब्रुवारी रोजी लाँच होणार असून लाँचिंग इव्हेंट हा दिल्ली येथे होणार आहे.

OnePlus TV 65 Q2 Pro स्मार्ट टीव्ही लाँच करताना चांगले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. याच प्रकारचे फीचर्स असणाऱ्या सिरीज लाँच करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे व प्लसचे संस्थापक पीट लाऊ म्हणाले. या स्मार्टटीव्हीमुळे वनप्लसचा भारतातील IoT कनेक्टेड इकोसिस्टम पोर्टफोलिओ आणखी वाढणार आहे.

हेही वाचा : BSNL ने आणले ‘हे’ जबरदस्त फिचर, आता सेटअप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन प्लस कंपनीने २०१९ मध्ये भारतामध्ये Q1 या सिरीजमधील स्मार्ट टीव्हीचे लाँचिंग केले होते. मात्र आता लाँच केल्या जाणाऱ्या टीव्हीमध्ये अनेक फीचर्स कंपनीकडून देण्यात आली आहेत. यामध्ये टीव्हीची स्क्रीन ही ६५ इंचाची 4K क्यूएलईडी स्क्रीन आहे. तसेच अँड्रॉइड os वर आधारित असून यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल सोतरेज कंपनीकडून देण्यात आले आहे. तसेच यात ७० वॅटचे साउंड आउटपुट देण्यात आले आहे. तसेच व्हॉईस असिस्टंट सपोर्ट, पिक्चर एन्हांसमेंट टेक्नॉलॉजी आणि ऑडिओसाठी डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट व इतर अनेक फीचर्स या स्मार्ट टीव्हीमध्ये देण्यात आली आहेत.