स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेक उत्कृष्ट स्मार्टफोन लॉंच होत आहेत. यातच आता वनप्लस नवीन स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक झाले आहे. हा बजेट फोन OnePlus Nord 2 CE Lite 5G आहे. हा फोन या वर्षाच्या अखेरीस लॉंच केला जाऊ शकतो. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल सविस्तर जाणून घ्या.

अनेक स्मार्टफोन साइट्सवर स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. त्यानुसार, असे सांगितले जात आहे की वनप्लसचा हा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन ६.५९ इंचाच्या फुल-एचडी फ्लुइड डिस्प्लेसह येईल आणि त्याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ 5G चिपसेट दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ८ GB पर्यंत रॅम आणि २५६ GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज असेल. आगामी OnePlus Nord 2 CE Lite 5G मध्ये ६४ MP कॅमेरा आणि ५००० mAh पॉवरफुल बॅटरी दिली जाऊ शकते.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य

आणखी वाचा : Vivo चा नवीन T सीरीज स्मार्टफोन ९ फेब्रुवारीला होणार लॉंच, सलग २० तास चालवूनही बॅटरी लो होणार नाही

स्‍पेसिफिकेशन
या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचं झालं तर, यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचे दोन सेकेंडरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेल कॅमेरा असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय हा फोन ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh असण्याची शक्यता आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट सह लॉंच केला जात आहे. ज्यामध्ये ६ GB किंवा ८ GB रॅम दिली जाऊ शकते. OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये १२८ GB किंवा २५६ GB स्टोरेज दिले जाऊ शकते. मात्र, त्यात वाढवता येण्याजोगे स्टोरेजही देता येईल, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

आणखी वाचा : WhatsApp Tips: तुमचं अकाउंट हॅक होण्यापासून कसं रोखायचं? जाणून घ्या

इथे माहिती लीक झाली
OnePlus Nord 2 CE Lite 5G डिटेल्स टिपस्टर Steve Hemmerstoffer (@OnLeaks) द्वारे Smartprix च्या सहकार्याने शेअर केले आहेत. आगामी OnePlus स्मार्टफोनबद्दल असा दावा केला जात आहे की हा फोन पहिल्यांदा भारतात लॉंच केला जाईल. त्यानंतर ते इतर देशांमध्ये लॉंच केले जाईल. या फोनमध्ये ६.५९ इंचाचा फुल-एचडी फ्लुइड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

OnePlus Nord CE 2 5G या महिन्यातच लॉंच होईल
One Plus चा फोन या महिन्यात फेब्रुवारीमध्ये लॉंच होऊ शकतो. अहवालानुसार, OnePlus Nord CE 2 5G यावर्षी ११ फेब्रुवारी रोजी लॉंच होणार आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. पण, OnePlus Nord CE 2 आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G च्या लॉंचची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.