वनप्लस, आज म्हणजेच १७ फेब्रुवारीला भारतीय बाजारपेठेत आपल्या नॉर्ड सीरिजमधील नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G लॉंच करणार आहे. असे सांगितले जात आहे की हा वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन असेल. वनप्लस नॉर्ड सीई २ ५जी सोबतच कंपनी OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge स्मार्ट टीव्हीसुद्धा सादर करणार आहे. वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी ९०० प्रोसेसरसोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनप्लस नॉर्ड सीई २ ५जी आणि वनप्लस टीव्ही वाय१एस, वनप्लस टीव्ही वाय१एस एड्ज टीव्हीच्या लॉंचिंगसाठी ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज संध्याकाळी ७ वाजता होईल. कंपनीच्या युट्युब चॅनेलवर आपण हा कार्यक्रम पाहू शकतो.

तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप खराब झालाय? सारखा चार्ज करावा लागत असेल तर जाणून घ्या ‘या’ टिप्स

वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीची किंमत :

वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीची सुरुवातीची किंमत २३, ९९९ रुपये असू शकते. या किमतीत ६ जीबी रॅमसोबत १२८जीबी स्टोरेज मॉडेल मिळेल. तर ८जीबी रॅमसोबत १२८जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत २५,९९९ रुपये असू असते. वनप्लस नॉर्ड सीई २ ५जी बहामा ब्लु आणि ग्रे मिरर कलर मध्ये सादर केला जाईल.

वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीचे स्पेसिफिकेशन्स :

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट ९०Hz असेल. हा फोन बहामा ब्लू आणि ग्रे मिरर कलरमध्ये सादर केला जाईल. रॅम आणि स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती नाही, पण असा अंदाज आहे की हा फोन २५६ जीबीपर्यंत स्टोरेज आणि ८जीबी रॅमसह लॉंच केला जाईल.

आता Flipkart वरही विकता येणार स्मार्टफोन; ‘असे’ काम करते ‘Sell Back’ ऑप्शन

वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीमध्ये ६४ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा असू शकतो. यात दुसरी लेन्स ८ मेगापिक्सेलची असेल. फोनमध्ये २ मेगापिक्सेलचा तिसरा सेन्सरसुद्धा असेल. यात १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. वनप्लसच्या या फोनला ४५००एमएएच बॅटरी आणि ६५Wच्या सुपरVOOC फास्ट चार्जिंगसह लॉंच केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus will launch its cheapest phone smart tv will also be introduced pvp
First published on: 17-02-2022 at 16:41 IST