ChatGpt Paid Version: सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या अधिकृत हॅण्डलवरून ओपनएआय (OpenAI ) ने पुष्टी केली आहे की ते लवकरच चॅटजीपीटीचे पेड व्हर्जन आणणार आहेत. तसेच कंपनीने चॅटजीपीटी प्रोफेशनल चैटबॉटचे पेमेंट व्हर्जनसाठी वेटिंग लिस्ट शेअर केली आहे. या लिस्टचे टेकक्रंच(TechCrunch) ने स्पॉट केले आहे. या पेमेंट व्हर्जनमध्ये सर्व नवीन फीचर्स असणार आहेत. यात ब्लॅकआउट विंडो नाहीत आणि थ्रॉटलिंगशिवाय हे वेगाने प्रतिसाद देते. ते करण्यासाठी तुम्हाला साईन अप करण्यासाठी तुम्हाला Google फॉर्म भरावा लागेल. चॅटजीपीटी वापरकर्त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे सदस्यत्वाची किंमत ठरवणार आहे.

हेही वाचा : २०० दशलक्ष लोकांचा डेटा चोरी झाल्याचा दावा Twitterने फेटाळला

जर तुम्ही प्रोफेशनल चॅट करण्यासाठी पात्र ठरला तर पेमेंटच्या प्रोसेससाठी कंपनी तुम्हाला संपर्क करणार आहे. सध्या प्रीमियम व्हर्जन हे सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्याची कोणतीही योजना कंपनीची नाही आहे. OpenAI ने चॅटजीपीटी प्रोफेशनलची किंमत व ते कधी उपलब्ध होणार आहे याची तारीख जाहीर अद्याप जाहीर केलेली नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Openai to bring paid version of chatgpt professional no blackout window price tmb 01
First published on: 13-01-2023 at 10:59 IST