scorecardresearch

सॅमसंगला टक्कर देणार OPPO चा फोल्डेबल Find N2 Flip; वाचा फोनचे जबरदस्त फिचर्स आणि किंमत

दोन डिस्प्ले असलेला ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतीयांच्या पसंतीस उतरतो की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

oppo find n2 flip launching in india on march 13 check specs and price details
ओप्पो फाइंड एन२ फ्लिप (photo credit – oppo india twitter )

ओप्पोचा फोल्डेबल फोन ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनची (OPPO Find N2 Flip) प्रतिक्षा अखेर संपली आहे, कंपनीने जगभरातील अनेक देशांमध्ये हा जबदरस्त फोन लाँच केला आहे आणि लवकरचं तो भारतात लाँच होणार आहे. ओप्पोने ट्विटरवर याबाबतची घोषणा केली आहे. ओप्पोने सांगितले की, १३ मार्च रोजी भारतात OPPO Find N2 Flip स्मार्टफोन लाँच केला जाईल.

Oppo Find N2 Flip च्या भारतातील लाँचिंग नंतर त्याची Samsung Galaxy Z Filp शी टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण सॅमसंगचा हा फोन देखील ओप्पोच्या तोडीसतोड आहे.

हटके डिझाईन असलेला ओप्पोचा हा फोन दोन डिस्प्लेला सपोर्ट करतो. याची फक्त स्टाईलचं शानदार नाही तर फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील जबदरदस्त आहेत. अॅडव्हान्स फीचर असलेल्या ओप्पो फाइंड एन 2 फ्लिप स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्सची माहिती जाणून घ्या.

कंपनीने यापूर्वीच ओप्पो फाइंड एन2 फ्लिप मोबाईलच्या फिचर्ससंदर्भात खुलासा केला होता. या फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. या फोल्ड स्मार्टफोनमध्ये 3.26-इंच वर्टिकल कव्हर डिस्प्ले आहे जो 17:9 उभ्या लेआउटसह फोनच्या वरच्या अर्ध्या भागाच्या 48.5% भाग घेतो. हा फोन सध्या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, एक म्हणजे मूनलाईट पर्पल आणि दुसरा एस्ट्रल ब्लॅक.

यातील मेन डिस्प्ले 6.8 इंचाचा असून फुलएचडी+ 2520 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच फोन फोल्ड केल्यानंतर एक छोटी स्क्रीन बाहेर दिसते ज्यात 720 × 382 पिक्सल रिजोल्यूशन मिळते. या दोन्ही डिस्प्लेमध्ये अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे फोनमध्ये शानदार शार्प व्हिज्युअल क्वॉलिटी येते.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिपच्या प्रायमरी स्क्रीनवर 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. तर सेकंडरी स्क्रीनवर 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट व 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. मेन स्क्रीनवर 1600 निट्स ब्राइटनेस, 403 पीपीआय आणि 16.7 एम कलर सारखे फिचर्स मिळतात. यासोबत बाहेरच्या स्क्रीन 900 निट्स ब्राइटनेस व 250 पीपीआयला सपोर्ट करते. ओप्पोच्या या फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनचा कॅमेरा

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोन लेटेस्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.0 ला सपोर्ट करतो. ओप्पो हा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर आणि 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्ससह येतो. यातील एक 7 पी आणि दुसरी 5जी लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 3.2 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4 एनएम मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. तसेच 16 जीबी पर्यंतचा रॅम आणि 512 जीबी पर्यंतचा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे जे LPDDR5 RAM आणि UFS3.1 ROM टेक्नॉलॉजीवर काम करतात.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनची बॅटरी

या स्लीक स्मा्र्टफोनमध्ये शक्तीशाली बॅटरी देण्यात आली आहे. 4,300एमएएच बॅटरी असलेल्या या फोनची बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी यात 44W SUPERVOOC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा ओप्पो मोबाइल ओटीजी रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे दुसरे डिव्हाइस देखील चार्ज करता येतात. हा फोन दहा मिनिटांत 25 टक्के चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनची किंमत

ओप्पो इंडियाने ट्विट करत म्हटले की, मोठा लाँच सोहळा होणार आहे. 13 मार्चलाच किंमत जाहीर होईल. यामुळे कंपनीकडून सोशल मीडिया अकाउंटवरून किंमत जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. या फोनची ग्लोबल प्राइस 849 युरो आहे. जी भारतीय करन्सीनुसार जवळपास ८४,००० पर्यंतच्या आसपास आहे. पण हाय टॅक्स रेटमुळे युकेमध्ये फोनची किंमत नेहमी जास्त असते. पण भारतात या फोनची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. कंपनीने OPPO Find N2 Flip चं प्रोडक्ट पेज ओपो इंडिया ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह केलं आहे, त्यामुळे भारतात या फोनची किंमत १३ मार्चला जाहीर होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 17:21 IST