स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने जागतिक बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Find X5 सीरिज सादर केली आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये आणला आहे. Oppo Find X5 Pro ची सुरुवातीची किंमत १,२९९ युरो ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, Oppo Find X5 च्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत ९९९ युरो ठेवण्यात आली आहे. मात्र, त्याची किंमत आणि भारतात लाँच करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये भारतीय बाजारपेठेतील iPhone 13 प्रमाणेच आहेत. ओप्पोचा हा फोन ग्लेझ ब्लॅक आणि सिरॅमिक व्हाईट कलर पर्यायांमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. Find X5 Pro फोनच्या १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १२९९ युरो (सुमारे १,१०,००० रुपये) आहे. दुसरीकडे, Find X5 ८ जीबी+ २५६ जीबीची किंमत ९९९ युरो (अंदाजे रु ८४,५००) आहे. कंपनी या सीरिजमध्ये आणखी एक फोन आणणार आहे, ज्याबद्दल त्याच्या रंग आणि इतर गोष्टींबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. Find X5 लाईट या नावाने हे जागतिक बाजारपेठेत सादर केले जाईल. ज्याची किंमत आणि फीचर्स लवकरच समोर येतील. त्याचबरोबर हा फोन स्टारलाईट ब्लॅक आणि ब्लू रंगामध्ये उपलब्ध असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Oppo Find X5 ची वैशिष्ट्ये

डिव्हाइस स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह आहे. फोन कस्टम 6nm MariSilicon X NPU पॅक असून कॅमेरा आणि AI कार्यप्रदर्शन सुधारण्यात मदत करेल असा दावा आहे. स्मार्टफोनमध्ये FHD + रिझोल्यूशन आणि १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ६.५५ इंचाचा OLED डिस्प्ले आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. Find X5 एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रुंद आणि अल्ट्रा-वाइडसाठी दोन ५०-मेगापिक्सेल Sony IMX766 सेन्सर आणि 2x ऑप्टिकल झूमसह १३-मेगापिक्सेल टेलिफोटो समाविष्ट आहे. ३२-मेगापिक्सेल सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी आहे. ५०-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सरमध्ये OIS देखील आहे.

Oppo Find X5 Pro ची वैशिष्ट्ये

Oppo Find X5 Pro मध्ये ६.७-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन ३२१६×१४४० आहे आणि रिफ्रेश दर १२० एचझेड आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 ऑक्टा-कोर प्रोसेसरने समर्थित आहे. हे ८० वॅट सुपरवूक फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येते. त्याची बॅटरी ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त १५ मिनिटे लागतात. हा स्मार्टफोन कलर ओएस १२.१ वर चालतो. स्मार्टफोनच्या मागील बाजूस ५० एमपी प्राथमिक कॅमेरा, ५० एमपी अल्ट्रा वाइड-एंगल सेन्सर आणि १३ एमपी टेलिफोटो लेन्स देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ३२ एमपी फ्रंट कॅमेरा आहे. ओप्पोच्या या नवीनतम स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच ड्युअल-सेल बॅटरी मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo launch find x5 series to competes with iphone 13 rmt
First published on: 26-02-2022 at 10:11 IST