आयआयटी (IIT) मद्रासचे माजी विद्यार्थी पवन दावुलुरी यांना मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या विभागाचे नेतृत्व पनोस पानाय हे करायचे. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर आता पवन दावुलुरी यांना हे पद मिळालं आहे. पनोस पानाय यांनी गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्ट कंपनी सोडली व ॲमेझॉन कंपनीमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्टने विंडोज आणि सरफेस गटांचे विभाजन केले होते. यापूर्वी पवन दावुलुरी यांनी सरफेस सिलिकॉन कामाची देखरेख केली, तर मिखाईल पारखिन यांनी विंडोज विभागाचे नेतृत्व केले. मिखाईल पारखिन आता नवीन भूमिका एक्सप्लोर करण्याच्या शोधात आहेत, त्यामुळे पवन दावुलुरी यांनी विंडोज आणि सरफेस दोन्हीची जबाबदारी घेतली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या Experience and Devices प्रमुख राजेश झा यांच्या अंतर्गत पत्रात, मिखाईल परखिनच्या प्रस्थानाची आणि पवन दावुलुरीच्या नवीन पदाची घोषणा करण्यात आली. पवन दावुलुरी आता राजेश झा यांना अहवाल देतील. तसेच या बदलाचा एक भाग म्हणून, अनुभव + उपकरणे (Experience + Devices) विभागाचा मुख्य भाग म्हणून Windows Experiences आणि Windows + Devices टीम्सना एकत्र आणणार आहेत. हे एआय युगासाठी विंडोज क्लायंट आणि क्लाउडमध्ये विस्तारणारे सिलिकॉन, सिस्टम, अनुभव आणि उपकरणे तयार करण्यासाठी एक दृष्टिकोन घेण्यास सक्षम करेल. पवन दावुलुरी या संघाचे नेतृत्व करतील आणि राजेश झा यांना अहवाल देतील. शिल्पा रंगनाथन आणि जेफ जॉन्सन आणि त्यांची टीम थेट पवन दावुलुरीना रिपोर्ट करतील. विंडोज टीम मायक्रोसॉफ्ट एआय टीमबरोबर, सिलिकॉन आणि अनुभवांवर जवळून काम करत राहील”, असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा…युजर्सची चिंता मिटली! आता स्टेटसवर एक मिनिटांचा VIDEO करता येणार शेअर; पाहा डिटेल्स

पवन दावुलुरी यांचे भारतीयांबरोबर खास कनेक्शन आहे. कारण त्यांनी प्रतिष्ठित आयआयटी मद्रासमधून आयआयटी पदवी प्राप्त केली आहे. पवन दावुलुरी हे मायक्रोसॉफ्टबरोबर जवळजवळ २३ वर्षांपासून काम करत आहेत. मेरीलँड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एमएस पूर्ण केले व मायक्रोसॉफ्टमध्ये विश्वासू व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. तसेच त्यांच्या नवीन पदासह ते आता सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांसारख्या व्यक्तींसह, यूएसमधील टेक कंपन्यांमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या भारतीयांच्या यादीत सामील झाले आहेत.