अनेक कंपन्यांनी जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात दिग्गज टेक कंपन्यांचा समावेश आहे. Google, Meta, Microsoft यासह अनेक कंपन्यांचा यात समावेश आहे. काही कंपन्यांनी दोनवेळा कर्मचारी कपात केली आहे. पण आता या यादीमध्ये अशा कंपनीचा समावेश झाला आहे की, जी कंपनी बेरोजगारीशी लढणाऱ्या लोकांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करत असते. तुम्ही बरोबर ऐकत आहात, जॉब लिस्टिंग पोर्टलने Indeed ने कर्मचारी कपात करण्याचे जाहीर केले आहे.

जॉब लिस्ट पोर्टल असणाऱ्या Indeed कंपनीने जाहीर केले आहे की ते सुमारे २ ,२०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ही कपात कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे १५ टक्के इतकी असणार आहे.

हेही वाचा : सार्वजनिक ठिकाणचे WiFi वापरताय? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकते नुकसान

Indeed कंपनीचे सीईओ ख्रिस हायम्स यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहून कर्मचारी कपातीमागील कारणे सांगितली आहेत. ते म्हणाले, ज्या कंपनीचे ध्येय लोकांना नोकऱ्या शोधण्यासाठी मदत करणे हे आहे. मी दररोज विचार करतो की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नोकरी किती महत्वाची आहे. नोकरी गमावणे आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या खूप कठीण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्यावर इंडिड कंपनीने लोकांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कंपन्यांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया थंडावली आहे. ही कंपनी म्हणजे एक जॉब सर्च करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. जे लोकांना नोकऱ्या शोधण्यासाठी मदत करते.