फोनमधून सुद्धा तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. खरं तर, जेव्हा तुम्ही आयफोनवरून फोटो किंवा व्हिडीओ शूट करता तेव्हा ते आयफोन स्टोअरमध्ये सेव्ह राहतात. हे फोटोज आणि व्हिडीओज मेटाडेटाच्या फॉर्ममध्ये सेव्ह केला जातात आणि हा मेटाडेटा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो.

आयफोन हा डेटा संरक्षणाच्या बाबतीत सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन मानला जातो, परंतु या फोनमधून सुद्धा तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. खरं तर, जेव्हा तुम्ही आयफोनवरून फोटो किंवा व्हिडीओ शूट करता तेव्हा ते आयफोन स्टोअरमध्ये सेव्ह राहतात. हे फोटोज आणि व्हिडीओज मेटाडेटाच्या फॉर्ममध्ये सेव्ह केला जातात आणि हा मेटाडेटा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो.

World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

जेव्हा तुम्ही iPhone वरून फोटो काढता तेव्हा तुमचे लोकेशन, शहराचे नाव आणि इतर अनेक माहिती त्यासोबत आपोआप सेव्ह होते. जेव्हा तुम्ही तुमच्या iPhone सोबत एखादा फोटो किंवा व्हिडीओ शेअर करता तेव्हा ही माहिती समोरच्या व्यक्तीला दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही एका गुप्त सहलीला गेला होता आणि तिथल्या मीटिंग रूममध्ये तुम्ही फोटो क्लिक केला असेल. तुम्हाला वाटेल की तो फक्त खोलीचाच फोटो आहे, पण त्या फोटोसोबत लोकेशन आणि तारीख सुद्धा शेअर झाली तर काय होईल? याची कल्पना करा. तुमची वैयक्तिक माहिती अगदी सहज लीक होऊ शकते.

आणखी वाचा : Mobile Number Link With Aadhar Card : घरबसल्या पाहू शकता तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरसोबत लिंक आहे की नाही?

मेटाडेटा म्हणजे काय?
जेव्हा फोटो आणि व्हिडीओ आयफोनमध्ये सेव्ह केले जातात, तेव्हा ठिकाण आणि शहरासह इतर अनेक तपशील मेटाडेटामध्ये बॅच म्हणून सेव्ह केले जातात. ते सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही iPhone वरून घेतलेल्या फोटो आणि व्हिडीओंमधून स्थान, शहर आणि इतर माहिती हटवू शकता.

आयफोनच्या या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ही खास सुविधा उपलब्ध आहे
ज्या iPhones मध्ये तुम्हाला iOS 15 ऑपरेटिंग सिस्टम मिळते, त्यात तुम्हाला मेटाडेटा वर्णन हटवण्याची सुविधा मिळते. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ज्याद्वारे तुम्ही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी लोकेशनसह इतर माहिती हटवू शकता.

आणखी वाचा : Facebook Security Check: तुमचं फेसबूक अकाउंट दुसरं कोणी तर वापरत नाही ना? दोन मिनिटात असं करा चेक

फोटोंमधून डेटा कसा हटवायचा?
iPhone मध्ये फोटो आणि व्हिडीओंमध्ये अंदाजे स्थान दर्शविणारा नकाशा असतो. आपण काही स्टेप्स करून ते हटवू शकता. चला या स्टेप्सबद्दल जाणून घेऊया..

  • ज्या फोटोमध्ये तुम्हाला मॅप काढून टाकायचा असेल तर तो फोटो निवडा, फोटोवर नेविगेट करा आणि अॅडजस्ट करा
  • त्यानंतर स्वाइप करा, ज्यामध्ये तुम्हाला माहिती दिसेल, तुम्हाला त्यावर टॅप करावे लागेल
  • नंतर मॅपच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात अॅडजस्ट करा, जे तुमच्या फोटोचं लोकेशन दर्शवेल
  • शेवटी नो लोकेशन वर टॅप करा, त्यानंतर फोटोमधून मॅप आपोआप गायब होईल.