scorecardresearch

तुमच्या आदेशानुसार अन्न शिजवेल ‘हे’ यंत्र; बेक, ग्रिल, रोस्टचाही पर्याय, जाणून घ्या किंमत

फिलिप्सने एक नवे उपकरण बाजारात उपलब्ध केले आहे. ज्यात तुम्ही वॉईस कमांड देऊन अन्न शिजवू शकता. आहे न भन्नाट उपकरण.

तुमच्या आदेशानुसार अन्न शिजवेल ‘हे’ यंत्र; बेक, ग्रिल, रोस्टचाही पर्याय, जाणून घ्या किंमत
फिलिप्स (Pic credit – philips)

तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. फॅनसारख्या वस्तू ज्यांचा वेग रेग्युलेटरने वाढायचा त्याला आता रिमोटचा पर्याय आला आहे. वॉईस कमांडने तर काहीच करायची गरज नाही, केवळ ऑर्डर सोडल्यावर तडकाफडकी कामे होतात. लाईट बंद करणे, दरवाजे लॉक ऑनलॉक करणे या सारखी कामे आता वॉईस कमांडणे होऊ शकतात. दरम्यान अन्न शिजवणाऱ्या उपकरणांना देखील हे फीचर देण्यात आले आहे. फिलिप्सने एक नवे उपकरण बाजारात उपलब्ध केले आहे. ज्यात तुम्ही वॉईस कमांड देऊन अन्न शिजवू शकता. आहे न हे भन्नाट उपकरण.

एअरफ्रायर एक्सएल कनेक्टेड असे या उपकरणाचे नाव आहे. हा एअरफ्रायर ८० अंश सेल्सिअस ते २०० अंश सेल्सिअस तापामान श्रेणीमध्ये स्वयांपाक करण्याचा पर्याय देतो. तसेच याच्या रॅपिड एअर तंत्रज्ञानासोबत अन्न फ्राई केल्यास गुणवत्ता आणि पौष्टिकतेवर काही फरक पडत नाही. त्याचबरोबर हे उपकरण न्युट्रीयू अ‍ॅपसोबत काम करतो आणि अन्न कसे आणि किती वेळ शिजवावे याची माहितीही देतो.

(७ हजारांचा इअरबड केवळ २४९९ ला, Amazon sale मध्ये ‘या’ इअरबड्सवर मोठी सूट, सुवर्ण संधी सोडू नका)

टच स्क्रिनसोबत मिळते प्री प्रोग्राम्ड फंक्शन्स

फिलिप्स एअरफ्रायर एक्सएलमध्ये एका टच स्क्रीन डिस्प्लेबरोबर सात प्री प्रोग्राम्ड फंक्शन्स देण्यात आले आहेत. ज्यात अन्न गरम करणे, फ्राई, बेक, ग्रिल आणि रोस्ट करण्यासह रीहिट करण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे. एकावेळी पाच लोकांचे अन्न फ्राय करण्यासाठी यात १.२ किलो क्षमतेची एक बास्केट आणि ६.२ लिटरचे पॅन देण्यात आले आहे. हे दोन्ही भाग काढता येतात.

करा इन्टेलिंजेंट कुकिंग

नवीन फिलिप्स डिवाइसमध्ये अमेझॉन आणि अलेक्साचे इंटिग्रेशन देण्यात आले आहे ज्याच्या सहायाने इंटेलिजेंट कुकिंग करता येऊ शकते. अलेक्सामुळे युजरला आपल्या आवाजाने हे उपकरण चालवता येणार आहे. तसेच, न्युट्री यू अ‍ॅपमध्ये १०० पेक्षा अधिक पाककृतींचा डेटाबेस आहे. वापरकर्ते या अ‍ॅपमध्ये त्यांच्या आवडीच्या पाककृती तयार करू शकतात आणि साईनअप केल्यावर त्या खात्यावर अपलोड करू शकता.

(Apple iphone : लवकर इनस्टॉल करा IOS चा नवा अपडेट, अन्यथा कॅमेऱ्याची ‘ही’ समस्या कायम राहील)

इतकी आहे किंमत

फिलिप्स एयरफ्रायर एक्सएल कनेक्टेडची किंमत भारतात १७ हजार ९९५ इतकी आहे. या उपकरणाला फिलिप्सच्या एक्सक्लुझिव्ह डोमेस्टिक अप्लायंस ई स्टोअरमधूनच खरेदी करता येऊ शकते. लाँच ऑफरमध्ये हे उपकरण १७ हजार ०९९ रुपयांमध्ये मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या