PM Modi Wears JIO glass Features: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हटके स्टाईलचे लाखो चाहते आहेत. मोदी वापरतात तसा पेहराव, हेअरस्टाईल, इतकंच काय तर दाढी वाढवूनही अनेकजण पाहायला मिळतात. मोदी यांच्या अशाच एका लुकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. १ ऑक्टोबर २०२२ ला 5G प्रकल्पाचे उद्घाटन करताना मोदींचा खास लुक आपणही पाहिला असेल. यामध्ये मोदींनी घातलेला खास चष्मा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. मोदींचा काळा चष्मा हा जिओ कंपनीची निर्मिती आहे. हा साधा चष्मा नसून एक स्मार्ट डिव्हाईस असल्याचे समजतेय. जिओतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार ऑनलाईन खेळ व मनोरंजनाचा अनुभव अधिक उत्तम करण्यासाठी या डिव्हाईसची निर्मिती करण्यात आली आहे. काय आहे हे डिव्हाईस जाणून घेऊयात…

तर मोदींनी घातलेल्या काला चष्माचं नाव आहे जिओ ग्लास. हा चष्मा आपण आपल्या स्मार्ट वॉच, मोबाईल, टॅबलेट व अन्य उपकरणांना जोडू शकता. याचा वापर करून आपण व्हिडीओ स्ट्रीमिंगही करू शकत असल्याचे समजतेय. हा चष्मा 2D सह 3D दृश्य पाहतानाही वापरता येऊ शकतो. यामध्ये (1920X 1080 पिक्सल) असे रिझोल्युशन असल्याने आपल्याला दिसणारे प्रत्येक दृश्य हे स्पष्ट असेल यात शंका नाही. चष्म्यामध्ये आपल्याला आवाजासाठी अंतर्गत स्पीकर सुद्धा देण्यात आले आहेत.

विश्लेषण: 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!

जिओ ग्लास बद्दल आणखी सांगायचे तर, याच्या वापराने आपण ५० अंशातील प्रत्येक दृश्य नीट व स्पष्ट पाहू शकता. यासह आपल्याला ग्लास कंट्रोलरही उपलब्ध होतो ज्याच्या मदतीने आपण ब्राईटनेस म्हणजेच प्रकाश कमी जास्त करू शकता. जिओ ग्लास हा सामान्य व्हिडीओ पाहण्यासाठी तसेच होलोग्राफिक व्हिडीओ पाहण्यासाठी सर्वात प्रभावशाली असल्याचे रिलायन्सतर्फे सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिलायन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या चष्म्याचा शैक्षणिक वापरही फायदेशीर ठरू शकतो. जिओ ग्लास वापरून विद्यार्थी 2D सह 3D पद्धतीनेही विविध विषय समजून घेऊ शकतात. अद्याप हे डिव्हाईस बाजारात उपलब्ध झालेले नाही मात्र लवकरच रिलायन्सतर्फे ही नवीन निर्मिती बाजारात आणली जाईल असे समजत आहे.