Poco ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता सुद्धा कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Poco X5 5G असे या फोनचे नाव असून हा भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनच्या किंमतीबद्दल, फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
Poco X5 5G चे फिचर्स
Poco X5 5G मध्ये तुम्हाला अँड्रॉइड १२ वर आधारित MIUI 13 अपडेट मिळणार आहे. त्याशिवाय या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी + AMOLED स्क्रीन मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. फोनमध्ये Snapdragon 695 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा : पोपट विकल्यानं युट्यूबरला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय? वाचा…
Poco X5 5G या स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्याची प्रायमरी लेन्स ४८ मेगापिक्सलची आहे. दुसरी ८ मेगापिक्सलची आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सलची आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि ३३ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, वाय-फाय, जीपीएस आणि एनएफसी हे फिचर उपलब्ध आहेत. या फोनचे एकूण वजन १८९ ग्रॅम इतके आहे.