scorecardresearch

RBI ची ‘ही’ सूचना लगेच पाळा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून कार्डद्वारे व्यवहार करताना येऊ शकतात समस्या

१ तारखेपासून डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. रिझर्व बँकेने या वर्षी ३० सप्टेंबर पर्यंत सर्व क्रडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या डेटाला टोकनमध्ये रुपांतरित करणे अनिवार्य केले आहे.

RBI ची ‘ही’ सूचना लगेच पाळा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून कार्डद्वारे व्यवहार करताना येऊ शकतात समस्या

सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीसाठी बाजारामध्ये लोकांची गर्दी होते. यासाठी मोठ्या प्रमाणात लोक डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा वापर करतात. मात्र, १ ऑक्टोबरपासून या व्यवहारात अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण १ तारखेपासून डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. रिझर्व बँकेने या वर्षी ३० सप्टेंबर पर्यंत सर्व क्रडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या डेटाला टोकनमध्ये रुपांतरित करणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी मूदत जुलै होती. मात्र ती तीन महिन्यांनी वाढवण्यात आली. आता हा नियम एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

कार्ड टोकनायझेशन म्हणजे काय?

पेमेंटसाठी ग्राहकाला त्याच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मला द्यावी लागत होती. ही माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे सुरक्षित ठेवत होते आणि पुढे कुठल्याही व्यवहारासाठी या माहितीचा वापर करत होते. याने माहिती चोरी होण्याचा धोका होता.

(Flipkart : फ्लिपकार्ट सेलला गालबोट, iphone 13 चे ऑर्डर झाले कॅन्सल, तक्रारकरते म्हणाले हा सेल..)

रिझर्व बँकेने केला उपाय

माहिती चोरी होऊ नये यासाठी रिझर्व बँकेने टोकनायझेशनचा नियम बनवला. यात कार्डच्या माहिती ऐवजी टोकन दिला जाईल. प्रत्येक व्यवहारासाठी टोकन आणि कोड वेगळा राहील, आणि व्यवहार करताना तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मला केवळ कोड किंवा टोकन नंबर द्यावा लागेल. टोकनायझेशन केल्याने ग्राहकांची माहिती सुरक्षित राहणार आहे.

क्रेडिट आणि डेबिट कार्ड टोकनमध्ये कसे बदलावे

  • आधी कुठल्याही ई-कॉमर्स संकेतस्थळावर किंवा अ‍ॅपवर खरेदी करा आणि पेमेंटची प्रक्रिया सुरू करा.
  • पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती टाका.
  • पेमेंट करताना ‘टोकनाइज यूअर कार्ड अ‍ॅजपर आरबीआई गाईडलाईन’ हा पर्याय निवडा.
  • नोंदनीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी भरा.
  • ओटीपी भरल्यानंतर तुमचा टोकन जनरेट करा आणि नंतर तुम्ही खरेदी करत असलेल्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या कार्डच्या माहिती ऐवजी केवळ टोकन सेव राहील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या