नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. फ्लिपकार्टवर तुम्हाला स्वस्तात ५ जी स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना १४ टक्के सूट देऊन ‘Realme 8s 5G’ हा दमदार स्मार्टफोन २०,९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. या डीलवरुन तुमची ३ हजार रुपयांची बचत होणार आहे. या फोनवर किती डिस्काउंट आणि कोणती ऑफर्स देत आहे, जाणून घ्या डिटेल्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Realme 8s 5G स्मार्टफोन असा मिळतोय ऑफर
फ्लिपकार्ट कंपनीच्या या डीलमध्ये Realme 8s 5G स्मार्टफोन फक्त १७,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Realme 8s 5G मध्ये तुम्हाला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनवर १४ टक्के सूट सोबतच तुम्हाला विविध बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहेत.

कंपनी तुम्हाला या स्मार्टफोनवर Axis Bank कार्डने पैसे भरल्यास ५ टक्के कॅशबॅक देईल. याशिवाय, कंपनीच्या भागीदार ऑफर अंतर्गत, तुम्ही Flipkart Pay Later साठी साइन अप करून ५०० रुपयांपर्यंतचे गिफ्ट कार्ड देखील मिळवू शकता. कंपनी तुम्हाला या फोनवर ईएमआय सुविधा देखील देत आहे जी ६२४ रुपये प्रति महिना पासून सुरू होते. त्याच वेळी, या डीलमध्ये, तुम्हाला तुमचा एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. जिथे तुम्ही १७,००० रुपयांची बचत करू शकता.

(आणखी वाचा : भारीच की! अवघ्या ५४९ रुपयांमध्ये खरेदी करा Realmeचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; पाहा कुठे मिळतेय ही धमाकेदार ऑफर!)

असा’ खास आहे Realme 8s 5G स्मार्टफोन

Realme 8s 5G स्मार्टफोन Realme चा पहिला स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये MediaTek Dimensity ८१० 5G प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले असून त्याचा रीफ्रेश रेट ९० Hz आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity ८१० SoC प्रोसेसरला सपोर्ट आहे. तसेच फोनमध्ये ६ GB आणि ८ GB रॅम सपोर्ट आहे. याशिवाय यात ५ GB व्हर्च्युअल रॅम, Android ११ ऑपरेटिंग सिस्टमसह Realme UI 2.0 कस्टम स्किन सपोर्ट आहे.  सेल्फीसाठी फोनमध्ये १६ एमपी कॅमेरा दिला आहे. तसेच यात देखील ५००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realme 8s 5g smartphone at rs 3000 cheaper on flipkart pdb art pdb
First published on: 20-11-2022 at 18:57 IST