Realme ने आपला नवीन स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च केला आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणि फीचर्स यांचा कंपनी करत असते. Realme ने आपला नवीन फोन Realme GT Neo 5 SE लॉन्च केला आहे. Realme GT Neo 5 SE या फोनमध्ये १६ जीबी रॅम आणि Snapdragon 7+ Gen 2 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची किंमत, त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Realme GT Neo 5 SE चे फीचर्स

Realme GT Neo 5 SE मध्ये तुम्हाला १.५ के रिझोल्युशन असलेले डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १४४ Hz इतका आहे. तसेच या फोनमधील ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये तुम्हाला ६४ मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स मिळेल. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये ४,५०० mAh ची बॅटरी आणि ३डी टेंपर्ड वेपर चैंबर (VC) कूलिंग एरिया मिळतो. तसेच याला १०० W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

हेही वाचा : Tech Layoffs: Apple मध्ये पहिल्यांदाच होणार कर्मचाऱ्यांची कपात; ‘या’ लोकांवर टांगती तलवार

Realme GT Neo 5 SE हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित आहे. फोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले मिळतो. यामध्ये GT mode 4.0 दिले असून यामुळे फाफॉनचा गेमिंग परफॉर्मन्स वाढतो. यामध्ये १ टीबीपर्यत स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, ग्लोनास, BeiDou, Galileo, QZSS, NFC आणि यूएसबी टाईप-सी असे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्पीकर सुद्धा देण्यात आला आहे.

काय आहे किंमत ?

Realme GT Neo 5 SE च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही १,९९९ चिनी युआन म्हणजेच (सुमारे २४,०००रुपये )इतकी आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही २,१९९ युआन म्हणजेच (सुमारे २६,२०० रुपये ) इतकी आहे. याशिवाय १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत ही २,५९९ युआन म्हणजेच (सुमारे ३१,००० रुपये ) इतकी आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realme launch gt neo 5 se with 1 5 k resolution 64 mp camera know price and all details tmb 01
First published on: 04-04-2023 at 12:38 IST