Nubia ने सोमवारी चीनमध्ये Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro गेमिंग स्मार्टफोन लॉंच केले. ZTE च्या सब-ब्रँड Nubia मधील या दोन्ही नवीन फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि १६ GB पर्यंत RAM आहे. Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro मध्ये ६.८ इंचाचा AMOLED स्क्रीन, अंडर-डिस्प्ले कॅमेरा यांसारखी फीचर्स आहेत. रेड मॅजिक सीरीजच्या या दोन फोन्सची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल सर्व काही जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nubia Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro Price
Nubia Red Magic 7S च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,९९९ चीनी युआन (सुमारे ४७,४०० रुपये) आहे. १२ GB RAM आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,७९९ रूपये चीनी युआन (सुमारे ५६,९०० रुपये) आणि १६ GB रॅम आणि ५१२ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५,४९९ चीनी युआन (सुमारे ६५,२०० रुपये) आहे.

तसंच Red Magic 7S Pro च्या १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५,१९९ चीनी युआन (सुमारे ६१,६५० रुपये) आहे. तर १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ५,९९९ चीनी युआन (सुमारे ७१,१०० रुपये) मध्ये येतो.

आणखी वाचा : तुमच्या Aadhaar वर किती फोन नंबर नोंदणीकृत आहेत? या पद्धतीने जाणून घ्या

कंपनीने स्पेशल ट्रान्सफॉर्मर एडिशन रेड मॅजिक 7एस प्रो व्हेरिएंट देखील सादर केला आहे, ज्याची किंमत ६,४९९ चीनी युआन (सुमारे ७७,००० रुपये) आहे. हा फोन १६ GB रॅम आणि ५१२ GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची प्री-बुकिंग सुरू झाली असून त्याची विक्री १५ जुलैपासून सुरू होणार आहे.

Nubia Red Magic 7S specifications
Nubia Red Magic 7S मध्ये ६.८ इंच फुलएचडी + AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. स्क्रीन SGS आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशनसह येते. फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो आणि १६ GB पर्यंत रॅम उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये ICE मॅजिक कूलिंग सिस्टम ९.० टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे ज्यामुळे फोनचे तापमान गेमिंग दरम्यान बराच काळ टिकू शकतं. स्मार्टफोनमध्ये ५१२ GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.

फोटो आणि व्हिडीओंसाठी Red Magic 7S मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल वाइड एंगल आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा अंडर डिस्प्ले कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फोनमध्ये GNSS GPS, GLONASS, Galileo, Baidu, Accelerometer, Proximity sensor, Ambient light sensor आणि Gyroscope आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १२० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट Android 12 आधारित Red Magic OS ५.५ वर चालतो.

Nubia Red Magic 7S Pro specifications
Red Magic 7S Pro मध्ये ६.८ इंच फुलएचडी + AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. फोनला Android 12 आधारित Red Magic OS ५.५ स्किन मिळते. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. हँडसेटमध्ये १६ GB पर्यंत रॅम आणि ५१२ GB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. फोनमध्ये ICE १०.० मॅजिक कूलिंग टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे.

फोनमधील रियर आणि फ्रंट कॅमेरा सेटअप Red Magic 7S सारखाच आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm जॅक आहे. फोनमध्ये GPS, GLONASS, Galileo, accelerometer, proximity sensor, ambient light sensor आणि gyroscope देण्यात आले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी ५५०० mAh बॅटरी आहे जी १३५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात DTS साउंडसाठी ड्युअल स्पीकर्स आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red magic 7s red magic 7s pro launched price 3999 cny under display camera launched price specifications prp
First published on: 11-07-2022 at 21:16 IST