रिलायन्स जिओ देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशातील पहिले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. देशांतील अनेक शहरांमध्ये जिओचे ५ जी नेटवर्क सुरु झाले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. त्यामध्ये अनेक फायदे ग्राहकांना कंपनी देत असते. आता सुद्धा कंपनी संपूर्ण कुटुंबासाठी एक पोस्टपेड प्लॅन घेऊन आली आहे. तर तो प्लॅन किती रुपयांचा आहे आणि त्यामध्ये कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.

Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी ३९९ रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन आणला आहे. या किंमतीमध्ये दुसरी कोणतीही टेलिकॉम कंपनी फॅमिली पोस्टपेड प्लॅन ऑफर करत नाही. एवढेच नाही तर यूजर्स या प्लॅनवर ३० दिवसांची ट्रायल देखील घेऊ शकतात. इथे दिलेली प्लॅनची रक्कम ही टॅक्सशिवाय दिलेली रक्कम आहे. याबाबतचे वृत्त Telecom Talk ने दिले आहे.

हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या

रिलायन्स जिओच्या ३९९ रुपयांच्या या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ७५ जीबी डेटा वापरायला मिळतो. हा डेटा संपल्यास तुम्हाला प्रत्येक १ जीबी डेटासाठी १० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. या फॅमिली प्लॅनमध्ये तुम्ही ३ सदस्य जोडू शकता. म्हणजेच तुम्ही या प्लॅनमध्ये ३ अतिरिक्त सिमकार्ड घेऊ शकता. प्रत्येक अतिरिक्त सिमकार्डसह महिन्याला ५ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस करण्याचा फायदा मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रिचार्ज प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे मिळतात. त्यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, आणि JioCloud याचा समावेश आहे. तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे प्रत्येक अतिरिक्त सिमकार्डसाठी महिन्याला तुम्हाला ९९ रुपये मोजावे लागणार आहेत. जर का तुम्ही तीन अतिरिक्त सिमकार्ड घेत असाल तर तुम्हाला ३९९ रुपये + (३ x ९९)रुपये = ६९६+ टॅक्स अशी रक्कम भरावी लागणार आहे. तुम्ही राहत असलेल्या भागामध्ये ५ जी नेटवर्क सुरु झाले असेल आणि तुमच्याकडे ५ जी स्मार्टफोन असेल तर तुम्हाला ५ जी सेवेचा फायदा घेता येऊ शकतो.