scorecardresearch

Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या

जिओचा हा स्वस्त प्लॅन रिचार्ज केल्यावर तुम्हाला मेसेजिंगसाठी १००० एसएमएसची सुविधा देखील मिळते.

Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या
Reliance Jio – संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणि ऑफर्स आणत असते. जर तुम्ही एका महिन्याच्या मुदती ऐवजी असा प्लॅन शोधात असाल ज्यात तुम्हाला तीन महिन्याच्या वैधतेचा प्लॅन मिळेल आणि अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळेल. तर यामध्ये आपण आज जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल जाणून घेऊयात.

सर्वात स्वस्त असणारा जीओचा प्रीपेड प्लॅन हा ३९५ रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. हा प्लॅन केल्यावर तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी डेटासुद्धा मिळणार आहे. आणि तुम्ही दररोज इंटरनेट वापरत नसल्यास हा जीओचा प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा : स्मार्टफोनसाठी स्वत:तली Tempered Glass वापरताय? महागात पडेल ही खरेदी; जाणून घ्या

जिओचा हा स्वस्त प्लॅन रिचार्ज केल्यावर तुम्हाला मेसेजिंगसाठी १००० एसएमएसची सुविधा देखील मिळते. त्याची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जीव सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड चे सब्स्क्रिप्शन देखील मिळते. जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत नसाल आणि तुम्हाला दीर्घ वैधतेचा व अनलिमिटेड कॉल्सचा प्लॅन हवा असल्यास जीओचा ३९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 18:37 IST

संबंधित बातम्या