Reliance Jio ही टेलिकॉम कंपनी आपल्या वापकर्त्यांसाठी नवनवीन प्लॅन लाँच करत असते. जिओ ५जी सर्व्हिस देशांमधील अनेक शहरात सुरु झाली आहे. रिलायन्स जीओ हे मुकेश अंबानी यांच्या मालकीचे असून त्यांनी २०२३ च्या सुरुवातीस २०२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. तसेच जिओने नुकतेच ३४९ रुपये आणि ८९९ रुपयांचे प्लॅन लाँच केले आहेत.
जिओने आणलेल्या या तीनही रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा देत आहे. ज्या ग्राहकांना दररोज अधिकच्या डेटाची आवश्यकता आहे त्यांना विचारात घेरून हे प्लॅन लाँच करण्यात आले आहेत.
रिलायन्स जीओचा २०२३ रुपयांचा प्लॅन
जीवच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २५२ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण ६३० जीबी देता वापरू शकतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस मिळतात. त्याशिवाय ioTV, JioCinema, JioSecurity और JioCloud चे सब्स्क्रिप्शन देखील मिळते. ५जी नेटवर्क असल्यास ग्राहक या प्लॅनमध्ये ५जी सेवेचा आनंद घेऊ शकणार आहेत.
रिलायन्स जीओचा ८९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जीओचा हा प्लॅन ९० दिवसांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा वापरायला मिळतो. ग्राहक या प्लॅनमध्ये २२५ जीबी डेटा वापरू शकतात. ५जी नेटवर्क असल्यास ग्राहक या प्लॅनमध्ये ५जी सेवेचा आनंद घेऊ शकणार आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस मिळतात. त्याशिवाय ioTV, JioCinema, JioSecurity और JioCloud चे सब्स्क्रिप्शन देखील मिळते.
हेही वाचा : ChatGPT वरून Amazon चा कर्मचाऱ्यांना इशारा; म्हणाले…
रिलायन्स जीओचा ३४९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या ३४९ रुपयांच्या या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक ७५ जीबी डेटा वापरू शकतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस मिळतात. त्याशिवाय ioTV, JioCinema, JioSecurity और JioCloud चे सब्स्क्रिप्शन देखील मिळते. ५जी नेटवर्क असल्यास ग्राहक या प्लॅनमध्ये ५जी सेवेचा आनंद घेऊ शकणार आहेत.