रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपल्या जिओ ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा देणार असल्याचं सांगितलं आहे. मोबाईल रिचार्जसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. जिओ ग्राहक आता त्यांच्या टॅरिफ प्लॅनसाठी युपीआय (UPI) म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे स्थायी निर्देशानुसार स्वयंचलित पेमेंट पर्याय सेट करू शकतात.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत कंपनीने भागीदारी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी ६ जानेवारीला कंपनीने एनपीसीआय सह संयुक्त निवेदन सादर केले. जिओसोबत दूरसंचार उद्योगासाठी यूपीआयचे स्वयंचलित पेमेंट (Auto Pay) सुरु करण्यात आल्याचे यात सांगण्यात आलं आहे.

रिलायन्स जिओ दूरसंचार कंपनीने म्हटलंय की या भागीदारीमुळे जिओ ग्राहकांना माय जिओ (MyJio) अ‍ॅपवर स्थायी सूचना सेट करण्यास मदत करेल, जेणेकरून ग्राहक कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या पसंतीच्या टॅरिफ प्लॅनचे रिचार्ज करू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.