Reliance Jio Offer: तुम्ही जर जीओचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जीओच्या प्रीपेड योजनेतून तुम्हाला बरंच काही भन्नाट मिळणार आहे. जीओकडे दररोज २ जीबी डेटा ऑफर करणार्‍या अनेक प्रीपेड योजना आहेत. जीओच्या अशा प्रीपेड पॅकची किंमत २४९ रुपयांपासून सुरू होते आणि २ हजार ८७९ रुपयांपर्यंत जाते. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जीओच्या अशाच रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात दररोज २ जीबी डेटासह तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत.

‘असे’ आहेत रिलायन्स जीओचे जबरदस्त ऑफर

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

जीओ २४९ प्लॅन
रिलायन्स जिओच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता २३ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ GB डेटानुसार एकूण ४६ GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो. जीओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस मिळतात. याशिवाय, कंपनी आपल्या ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश देखील देते.

जीओ २९९ प्लॅन

रिलायन्स जीओच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटानुसार एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो. जीओच्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. जीओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. जीओचा हा प्लॅन JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.

(आणखी वाचा : Jio Welcome Offer rolling out: जीओ वापरकर्त्यांसाठी भन्नाट ऑफर! आता मिळणार 5G सेवा मोफत; जाणून घ्या कसं?)

जीओ ५३३ प्लॅन

रिलायन्स जीओच्या ५३३ रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज २ जीबी डेटासह एकूण ११२ जीबी डेटा देण्यात आला आहे. जीओच्याया प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या रिचार्जमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सवर मोफत प्रवेश देखील मिळतो.

जीओ ७१९ प्लॅन

रिलायन्स जीओच्या ७१९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. दररोज २ जीबी डेटानुसार, या प्रीपेड पॅकमध्ये एकूण १६८ जीबी डेटा उपलब्ध आहे. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो. प्लॅनमध्ये ग्राहक अनलिमिटेड व्हॉईस कॉलचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये दररोज एकूण १०० एसएमएस ऑफर केले जातात. जीओच्या या रिचार्ज पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले आहे.

जीओ २८७९ प्लॅन

२८७९ रुपयांच्या जीओ प्रीपेड पॅकची वैधता ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण ७३० जीबी डेटा ग्राहक वापरू शकतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर त्याचा वेग ६४Kbps पर्यंत कमी होतो. जीओच्या या रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. जीओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. जीओच्या या रिचार्ज पॅकमध्ये Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.