रिलायन्स जिओ देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असून त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी Jio Plus सेवा सुरू केली आहे. जिओ प्लस सह कंपनी ग्राहकांना १ महिन्यासाठी अनलिमिटेड सेवा देणार आहे. जिओने ३९९ रुपयांचा एक नवीन प्लान आपल्या ग्राहकांसाठी लॅान्च केला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या असलेल्या जिओचे म्हणणे आहे की , वापरकर्ते या जिओ पोस्टपेड प्लॅनसह तीन अतिरिक्त कनेक्शन देखील जोडू शकतील. प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाठी, ग्राहकांना ९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन

Jio Plus च्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जर का ग्राहक तीन अतिरिक्त कनेक्शन घेत असतील तर त्यांना एकूण ६९६ रुपये (३९९+९९+९९+९९) भरावे लागणार आहेत. या पोस्टपेड प्लॅनमध्ये एकूण ७५ जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. म्हणजेच, ग्राहकांना एकूण ४ कनेक्शन असलेल्या फॅमिली प्लॅनमधील एका सिमवर दरमहा सुमारे १७४ रुपये खर्च करावे लागतील.याशिवाय जय ग्राहकांकहा अधिक डेटा खर्च होतो ते १०० जीबीचा प्लॅन घेऊ शकतात. यासाठी पहिल्या कानेक्शनसाठी ६९९ रुपये तर प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाथी ९९ रुपये अधिकचे मोजावे लागतील.

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Meta’ मध्ये दुसऱ्यांदा होणार तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले, “आपल्या सर्वांना…”

तसेच रीलयन्स जिओ या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने २९९ रुपये किंमतीचे दोन वैयक्तिक प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनमध्ये कंपनी ३० जीबी डेटा देत आहे. यामध्ये जर का तुम्हाला अनलिमिटेड डेटा हवा असेल तर तुम्ही ५९९ रुपयांचा Jio Plus प्लॅन घेऊ शकता.

जिओ ग्राहकांसाठी असलेल्या ऑफर्स

रिलायन्स जिओच्या नवीन जिओ प्लस प्लॅनसह नेक ऑफर लॉन्च करण्यात आल्या आहेत. Jio True 5G वेलकम ऑफर अंतर्गत ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा दिला जाणार आहे. हा डेटा प्लॅन प्रत्येक सिम कार्ड वापरकर्त्याच्या वापरासाठी उपलब्ध असेल. याशिवाय डेटासाठी कोणतीही दैनंदिन मर्यादा नाही म्हणजेच ग्राहक त्यांना पाहिजे तितका डेटा वापरू शकतात.

हेही वाचा : अनेकांची रात्रीची झोप उडाली; Apple वॉचच्या डेटामध्ये धक्कादायक खुलासा, पुरेशी झोप घ्या नाहीतर…

रिलायन्स जिओचे म्हणणे आहे की ग्राहकांना त्यांचा आवडता नंबर देखील निवडता येईल. या प्लॅन्समध्ये कंपनी सिंगल बिल, डेटा शेअरिंगसारख्या सुविधाही पुरवत आहे. याशिवाय OTT प्लॅटफॉर्म Netflix, Amazon, JioTV, Jio Cinema यांसारख्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही मोफत दिला जात आहे.

रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, जिओ फायबर वापरकर्ते, कॉर्पोरेट कर्मचारी आणि इतर टेलिकॉम ऑपरेटर्सच्या विद्यमान पोस्टपेड वापरकर्त्यांना जिओ प्लस – फॅमिली प्लॅनसाठी कोणतीही सुरक्षा डिपॉझिट भरावे लागणार नाही. याशिवाय एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना कोणतेही डिपॉझिट भरण्याची गरज नाही. जिओने म्हटले आहे की जर एक महिन्याच्या मोफत टेस्टिंगनंतर कोणताही वापरकर्ता सेवेबद्दल समाधानी नसल्यास तो त्याचे कनेक्शन कॅन्सल करू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio plus launched 399 plan with free trial offer and ott platform subscrption all details tmb 01
First published on: 15-03-2023 at 12:21 IST