Reliance Jio Offers: देशातील अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध ऑफर देत असतात. त्यात Prepaid किंवा Postpaid सह Broadband च्या ऑफरचाही समावेश आहे. याआधी Jio, Airtel, BSNL कंपन्यांनीही स्वस्त प्लॅन्स ग्राहकांना ऑफर केले होते. परंतु आता जीओच्या आणलेल्या बंपर ऑफरचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. या स्वस्त ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना चांगले फायदे मिळणार आहे.

कोणता आहे कंपनीचा प्लॅन ?

जीओच्या ३९५ रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत. या जीओच्या ३९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. जर तुम्ही दीर्घ वैधता योजना शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्याने सुमारे तीन महिन्यांचा तुमचा रिचार्ज करण्याचा त्रास संपेल.

आणखी वाचा : महाऑफर! २७ हजार ९९९ रुपयांचा ‘हा’ दमदार स्मार्टफोन फक्त ८ हजार ५९९ रुपयांमध्ये खरेदी करा; जाणून घ्या भन्नाट ऑफर्स

‘असे’ मिळतील फायदे

रिलायन्स जीओच्या या ३९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. यामध्ये उपलब्ध असलेला हाय स्पीड ६ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड मर्यादा ६४ केबीपीएसवर येईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, प्लॅनमध्ये ग्राहकांना १ हजार एसएमएस मिळतात. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जीओच्या ३९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना जीओच्या ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यामध्ये Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर एक्सेस उपलब्ध आहे. जीओचा हा ३९५ रुपयांचा प्लॅन ऑनलाइन रिचार्ज केला जाऊ शकतो. यासोबतच हा प्लान MyJio अॅपवरही उपलब्ध असेल.