Samsung Galaxy S23 मालिका लवकरच लाँच होणार असून अशातच कंपनीने नवीन मालिका येण्याआधीच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘Samsung Galaxy S22’ च्या किमतीत मोठी कपात केली आहे. Galaxy S22 च्या किंमतीत १० हजार रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

Samsung Galaxy S22 ची भारतात किंमत

सॅमसंगचा हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. कंपनीने या दोन्हीच्या किमती कमी केल्या आहेत. फोनच्या ८ जीबी रॅम + २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत पूर्वी ७२,९९९ रुपये होती, जी आता ६२,९९९ रुपयांवर आली आहे.

त्याचप्रमाणे, तुम्ही Galaxy S22 चा ८ जीबी रॅम २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट ७६,९९९ रुपयांऐवजी ६६,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच सॅमसंग शॉप अॅपवरून हा फोन खरेदी करणाऱ्या यूजर्सला कंपनी २ हजार रुपयांपर्यंतचा वेगळा फायदाही देत ​​आहे. सॅमसंगकडून हँडसेट फँटम ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

आणखी वाचा : Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या ‘या’ स्वस्त प्लॅन्समध्ये दररोज २ जीबी पर्यंत डेटा आणि मोफत काॅलिंगसह मिळेल बरचं काही…

Samsung Galaxy S22 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
– या सॅमसंग फोनमध्ये ६.१-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १२०Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून, कंपनी त्यात Snapdragon ८ Gen १ चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

– यामध्ये ५०-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह १२-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि १०-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी, तुम्हाला यात १० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– त्याचबरोबर, फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये ३७००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी २५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. खास गोष्ट म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला १५W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. तर, हा फोन Android १२ वर आधारित Samsung च्या One UI वर काम करतो.