Sennheiser ने भारतात आपले प्रीमियम वायरलेस हेडफोन ‘Sennheiser Momemtum 4’ लाँच केले आहेत. Sennheiser च्या या हेडफोन्सची बाजारात आधीपासून अस्तित्वात असलेल्या Sony WH-1000XM5 शी थेट स्पर्धा आहे. कंपनी आपल्या नवीन वायरलेस हेडफोन्समध्ये अक्टिव्ह नॉइज कैंसलेशनसह ६० तासांपर्यंत बॅटरीची लाईफ देत आहे. Sennheiser Momentum चारची किंमत ३४,९९० रुपये आहे. नवीन हेडफोन काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतात. हेडफोनचा काळ्या व्हेरिएंट अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसांत पांढऱ्या रंगाच्या हेडफोनची विक्री सुरू होणार आहे. हे हेडफोन तुम्ही दोन हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. जाणून घेऊया या हेडफोनचे खास फीचर्स.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Sennheiser चे नवीन हेडफोन हेड डिझाइनसह येतात. यामध्ये, कंपनी पावरफुल साउंडसाठी ४२ मिमी डायनॅमिक ड्रायव्हर सेटअप देत आहे.
त्यांची साउंड क्लैरिटी बेस्ट आहे. या हेडफोन्समध्ये SBC, AAC, aptX, aptX अडॅप्टिव्ह कोडेक्स देखील समर्थित आहेत. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी त्यात ब्लूटूथ ५.२ देत आहे.
(आणखी वाचा : सर्वात स्वस्त स्मार्टफोन! Infinix Smart 6 HD फक्त ५,२१९ रूपयांमध्ये… )
वापरकर्त्याला त्याच्या आवडीनुसार साउंड सेट करण्याची परवानगी देण्यासाठी, त्यात बिल्ट-इन ईक्यू प्रीसेट, साउंड मोड आणि साउंड पर्सनलाइजेशन फीचर प्रदान केले गेले आहे. कंपनी साउंड क्लैरिटी आणि कॉलिंगसाठी डैप्टिव नॉइज कैंसलेशन करण्याची सुविधा देखील देत आहे. यासोबतच तुम्हाला त्यात ट्रांसपेरेंसी मोडही मिळेल.
योग्य नॉइज रिडक्शन करण्यासाठी दोन्ही बाजूंना माइक देण्यात आले आहेत. बॅटरी लाइफबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की ती पूर्ण चार्ज केल्यावर ६० तास टिकू शकते. हेडफोनची बॅटरी दोन तासात पूर्ण चार्ज होते. त्याच वेळी, ते क्विक चार्जिंगच्या ५ मिनिटांमध्ये ४ तास टिकतात. चार्जिंगसाठी यात टाइप-सी पोर्ट आहे.