लास वेगास येथे CES २०२३ सुरु आहे. हा वर्षातील सर्वात मोठा टेक शो आहे. या शोमध्ये sony ची Afeela नावाची नवीन इलेक्ट्रिक कार येणार आहे जी २०२६ पर्यंत विक्रीसाठी बाजारात येणार आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये PlayStation VR 2 हेडसेटची विक्री सुरू करण्याची घोषणा एका जपानी कंपनीने केली होती. Afeela इलेक्ट्रिक कार sony ने इंट्रोड्यूस केली. Sony च्या CES 2023 इव्हेंटमधील ही येथे सर्वात मोठी घोषणा आहे.

‘Afeela’ इलेट्रीक कार २०२६ मध्ये येणार

यावर्षीच्या CES २०२३ मधील सर्वात मोठी बातमी म्हणजे सोनी कंपनीची येणार नवीन इलेट्रीक कार ‘Afeela.’ ही कार २०२६ मध्ये लाँच होणार असून यासाठी सोनी कंपनीने Honda सोबत ही कार विकसित केली आहे. यामध्ये Qualcomm तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये याच्या प्रिऑर्डर्स ओपन होतील. २०२६ च्या सुरुवातीस नॉर्थ अमेरिकेत याच्या विक्रीला सुरुवात होईल.

हेही वाचा – CES 2023: जगातील सर्वात मोठ्या ‘टेक शो’ मध्ये, चक्क ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कारही झाली लाँच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉकमन, प्लेस्टेशन आणि ट्रिनिट्रॉन टीव्हीसह हिटसाठी प्रसिद्ध असलेली सोनी कंपनी अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे. CES 2020 मध्ये, Sony ने Vision-S 01 प्रोटोटाइपची सुरुवातीची व्हर्जन आणले होते. इलेक्ट्रिक कारच्या डिझाईन आणि निर्मितीसाठी मोठा खर्च येतो. व्हॅक्यूम्स आणि हँड ड्रायर्ससाठी प्रसिद्ध असलेली ब्रिटीश कंपनी डायसन इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर काम करत होती पण जास्त खर्चामुळे त्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतला.