सध्या जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. अनेक मोठ्या कंपन्या खचाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपलपल्या कंपन्यांमध्ये नोकरकपात करत आहेत. माहितीच्या एका अहवालानुसार जे कर्मचारी १० लाखांपर्यंत कमावत होते त्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. google मध्ये कपात करण्यात आलेल्या कर्मचारी हे साधारण वार्षिक पाच ते दहा लाख या पॅकेजवर काम करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इन हाऊस रिसर्च आणि डेव्हेलपमेंट विभागातील कर्मचारी देखील या कपातीमध्ये प्रभावित झाले आहेत. अधिक प्रमाणात एरिया १२० टीमचा भाग हा विंड डाउन करण्यात आला आहे.

हेही वाचा : मायक्रोसॉफ्टनंतर आता ‘ही’ कंपनी करणार नोकरकपात; ३९०० कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असणारी मायक्रोसॉफ्ट आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीने यामागचे कारण हे आर्थिक मंदी असल्याचे सांगितले. कंपनीच्या म्हणण्यानुसार २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ते १०,००० नोकऱ्या कमी करणार म्हणुजेच १० हजार कमर्चाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. याबद्दल मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे.

१८ जानेवारी २०२३ पासून १८००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचे Amazon ने अलीकडेच जाहीर केले होते. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे हे करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे होते. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या घोषणेपेक्षा ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा : मोठया टेक कंपन्यांच्या नोकरकपातीमुळे टेन्शन आलंय? Layoff Anxiety पासून वाचण्यासाठी ‘या’ टिप्स करतील मदत

Byju’s

EdTech जायंट बायजूस या कंपनीने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मार्च महिन्यात ५ टक्के म्हणजे ५०,००० कामगारांची कपात करण्याचे जाहीर केले होते. कंपनीने केरळमधील मीडिया कंटेन्ट विभागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांची कपात ही प्रतिकूल व्यापक आर्थिक घटकांवर झालेल्या परिणामांमुळे आहे असे कंपनीचे सीईओ बायजा रवींद्रन म्हणाले.

Dunzo

फास्ट ग्रोसरी वितरित करणारी कंपनी डुंझोने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टीमच्या स्ट्रक्चर व नेटवर्कच्या डिझाइनकडे लक्ष देत आहे असे कंपनीचे सीईओ कबीर बिस्वास म्हणाले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech companies amazon to microsoft cut jobs due to the economic downturn tmb 01
First published on: 26-01-2023 at 15:23 IST