सेलमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी सगळेच ग्राहक उत्सुक असतात. कमी किमतीत आणि भन्नाट ऑफरसह मिळणाऱ्या या वस्तू घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण, ऑनलाइन किंवा सेलमधून वस्तू खरेदी करताना प्रत्येकाच्या मनात ‘फसवणुकीची’ भीती असते. पण, जर तुम्ही ऑनलाइन लॅपटॉप, मोबाइल खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर आम्ही काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. लोकसत्ता.कॉमच्या ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ या सीरीजमध्ये ‘Techy Marathi’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या धनंजय आणि प्रीती यांच्याशी इंटरव्ह्यूमध्ये गप्पा मारण्यात आल्या. हे जोडपे नेहमीच तंत्रज्ञानाच्या गोष्टी सहज समजावून सांगते. आज त्यांनी सेलमध्ये लॅपटॉप, मोबाइल खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सांगितले आहे. चला तर पाहू…

सेलमध्ये लॅपटॉप, मोबाइल खरेदी करताना पुढीलप्रमाणे काही गोष्टी लक्षात ठेवा :

धनंजय यांच्या मते- ऑनलाइन वस्तू खरेदी करणे धोकादायक नाही; पण वस्तू खरेदी करताना पुढील गोष्टींची नक्कीच काळजी घ्या :
१. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर वस्तू खरेदी करताना ‘सेलर’ कोण आहे ते बघा. सेलर Well known असला पाहिजे.
२. सेलरवर क्लिक करून तुम्ही बघू शकता की, त्याची पॉझिटिव्ह रेटिंग किती आहे. तसेच सेलर मोठा आहे की नाही हेसुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता. पॉझिटिव्ह रेटिंग बघा आणि त्यानुसार तुमचा फोन किंवा इतर गोष्टी निवडा.
३. एकदम रँडम सेलर किंवा न्यू सेलरचा टॅग असल्यास वस्तू खरेदी करणे टाळा.

हेही वाचा…Techy Marathi Exclusive: बॅटरी हेल्थ जपण्यासाठी चार्जर कसा निवडावा? फोन अपडेट केल्याने काही नुकसान होते का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानात किंवा ऑनलाइन मोबाइल खरेदी करताना आपण सगळ्यात आधी फक्त कॅमेरा बघतो आणि काही महिन्यांनी मोबाईल बिघडल्याची तक्रार करतो. तर, मोबाइल खरेदी करताना धनंजय यांनी पुढील गोष्टी बघितल्या पाहिजेत हे आवर्जून सांगितले आहे.
१. मोबाइल खरेदी करताना कॅमेराव्यतिरिक्त प्रोसेसर आणि डिस्प्ले बघावा.
२. मोबाइल खरेदी करताना प्रोसेसर बघावा. कारण- प्रोसेसरचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे; तो फास्ट आहे की नाही हे पाहून घ्यावे.
धनंजय यांनी सांगितले की, ग्राहक नेहमी तक्रार करतात की, दोन महिने फोन चांगला चालला. नंतर तो एकदम स्लो झाला. तर याचे मुख्य कारण म्हणजे मोबाइल खरेदी करताना ग्राहकांनी प्रोसेसर फास्ट आहे का किंवा चांगला आहे का? हे पाहिलेच नव्हते.
३. तसेच प्रोसेसर पाहिल्यानंतर तुम्ही मोबाइलमधील कॅमेरा आणि डिस्प्ले पाहून घ्या, असे सांगितले आहे. सेलमध्ये किंवा ऑनलाइन मोबाईल, लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.