Tecno Pova 3 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. Tecno ने भारतात डिव्हाईस लॉन्च करणार असल्याची खात्री दिली आहेTecno Pova 3 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. Tecno ने भारतात डिव्हाईस लॉन्च करणार असल्याची खात्री दिली आहे. . मात्र, अद्याप लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. Tecno Powa 3 ची मायक्रोसाइट Amazon India वर लाइव्ह झाली आहे. या मायक्रो-साइटवरून आगामी Tecno फोनची मुख्य फीचर्स समोर आली आहेत. टेक्नोच्या या फोनमध्ये 7000mAh बॅटरी, 50 मेगापिक्सलचा ट्रिपल-रिअर कॅमेरा, ६.९ इंचाचा HD+ डिस्प्ले यांसारखी फीचर्स दिली जाऊ शकतात. आता आम्ही तुम्हाला टेक्नो पोवा 3 शी संबंधित सर्व माहिती सांगणार आहोत.

मॉडेल क्रमांक LF7 सह आगामी Tecno Pova 3 सुमारे दोन महिन्यांपूर्वी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) वर दिसले होते. डिव्हाईसची रचना देखील उघड झाली आहे. टीझरनुसार Tecno Powa 3 ब्लू आणि सिल्व्हर कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हँडसेटच्या मागील पॅनलवर ड्युअल टोन फिनिश आणि व्हर्टिकल स्ट्रिप दिली जाईल.

आणखी वाचा : सर्वात धोकादायक पासवर्ड! हे ५० पासवर्ड चुकूनही वापरू नका, एका सेकंदात अकाउंट हॅक होईल

Tecno Pova 3 Specifications
Tecno Powa 3 मध्ये ६.९ इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले असू शकतो. स्क्रीनचे रिझोल्यूशन 1080 × 2460 पिक्सेल आहे आणि रीफ्रेश रेट 90 Hz आहे. कंपनी आपल्या आगामी फोनमध्ये IPS LCD स्क्रीन देऊ शकते.

Octa-core MediaTek Helio G88 प्रोसेसर Techno Powa 3 मध्ये दिला जाऊ शकतो. तर ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU असेल. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह हँडसेट लॉन्च होत असल्याच्या बातम्या आहेत. टीझरने पुष्टी केली आहे की, फोनला 5GB व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी मिळेल.

आणखी वाचा : नवीन फोनचा प्लान असेल तर थोडं थांबा ! OnePlus Nord 2T 5G लवकरच भारतात येतोय, ५० MP रियर कॅमेरा आणि बरंच काही…

Tecno Powa 3 मध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरे मिळण्याची अपेक्षा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा डिव्हाईसमध्ये दिला जाऊ शकतो. Tecno Powa 3 मध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 7000mAh बॅटरी मिळणार आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर, 4D व्हायब्रेशन आणि Z-अॅक्सिस लिनियर मोटर देखील असेल.