देशातील युजर्स केल्या कित्येक दिवसांपासून ५जी सर्व्हिसची आतुरतेने वाट बघत आहेत. पण त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यांनी ५जी सर्व्हिस लवकरच लॉंच होणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय, त्यांनी म्हटलंय की भारतातील अनेक गावांना ऑप्टिकल फायबर आणि इंटरनेटचा अ‍ॅक्सेस मिळेल.

५जी सेवा लॉंच करण्यासाठी बहुतेक मोठ्या टेलिकॉम कंपन्या दीर्घकाळापासून काम करत आहेत. यासाठीचा लिलाव नुकताच पार पडला. जिओ आणि एअरटेल ५जी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहेत. तथापि, लॉंचच्या तारखेबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. आधीच्या अहवालानुसार, जिओने १५ ऑगस्ट रोजी देशभरात ५जी सेवा सुरू केली जाऊ शकते असे संकेत दिले होते. याशिवाय कंपनी यावेळी ५जी फोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. जिओने गेल्या वर्षी आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला होता.

Photos : WhatsApp वर चॅट करणे होणार आणखीनच सुरक्षित; नव्या फीचरमुळे युजर्स खुश

एअरटेलने यापूर्वी एक प्रेस रिलीज जारी करून सांगितले होते की या महिन्याच्या अखेरीस कंपनी ५जी सेवा सुरू करू शकते. यापूर्वी कंपनीने त्याची चाचणी पूर्ण केली आहे. याशिवाय वोडाफोन आयडिया देखील लवकरच देशात ५जी सेवा सुरू करू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, ५जी सेवेसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. याचा अर्थ ४जी पॅकपेक्षा तो अधिक महाग असेल. मात्र, यामध्ये तुम्हाला ४जी पेक्षा जास्त स्पीड मिळेल.