आजकाल सोशल मीडियावर स्टोरीज किंवा आपण कुठे जातो काय करतो हे पोस्ट करणे हे करत असतो. तसेच आपण आपले फोटो सोशल मीडियावरपोस्ट करताना ते आकर्षक दिसावेत म्हणून स्नॅपचॅट असेल इंस्टाग्रामवर आपण फिल्टर वापरत असतो. सध्याचा काळ हा डिजिटल आहे. प्रत्येकजण आपले जीवन हे इंटरनेटसोबतच जगत आहे. सतत आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहोत. जसे की , मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तिथले फोटोज पोस्ट करणे, सेल्फी पोस्ट करणे आणखी नवीन काही केल्यास ते पोस्ट करणे हे हल्ली लोकांना आवडत आहे. पण याच गोष्टी अधिक आकर्षक करण्यासाठी लोकं हल्ली फेस फिल्टरचा वापर करत आहेत. या फिल्टर्समुळे तुमच्या चेहऱ्याला / फोटोला स्पेशल इफेक्टस देऊ शकता. ज्यामुळे तुमचा चेहरा आधीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागतो.

BeautyPlus Cam

BeautyPlus Cam हे iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्समध्ये सर्वात लोकप्रिय फेस फिल्टर अँप्सपैकी एक आहे. यामध्ये युजर्सना त्यांच्या फोटोवर टचअप करता येतो. यात युजर्सना त्यांची स्किन स्मूथ करणे , दाताचा रंग पांढरा करणे, डोळ्यांचा रंग बदलणे असे फीचर्स यामध्ये मिळतात. यामध्ये HD रीटच मिळतो. यासह यामध्ये अनेक टूल्स येतात जे वापरून तुम्ही तुमचा चेहरा अधिक आकर्षक करू शकता.

हेही वाचा : पेनड्राइव्ह होणार आता तुमच्या कॉम्प्युटरचा ‘सुरक्षारक्षक’; कसं ते जाणून घ्या

B612

B612 हे अँप ऑल-इन-वन कॅमेरा आणि फोटो/व्हिडिओ एडिटिंग म्हणून ओळखले जाते. Smart Beauty याचे मोठे फिचर असे आहे की , तुम्ही काढलेल्या सेल्फीमध्ये बदल करण्यास सांगते. यामध्ये रेट्रो, विंटर , कार्टून असे अनेक फीचर्स आहेत ज्याचा वापर युजर्स करत असतात.

Snow

Snow हे अँप सेल्फीवर फोकस करणारे एडिटिंग अँप आहे. या अँपमध्ये युजर्स ब्युटी इफेक्टस क्रिएट करण्यास आणि सेव्ह करता येतात. यामध्ये स्टिकर्स आणि भरपूर इफेक्टस असल्याने तुमचा सेल्फी अधिक आकर्षक होऊ शकतो. वरील अँपप्रमाणे snow अँप देखील iOS आणि Android दोन्हीवर उपलब्ध आहे.

हेही वाचा : One Plus वापरकर्त्यांसाठी खुशखबर, या स्मार्टफोनला आलं Android 13 चं अपडेट; जाणून घ्या

YouCam Perfect

YouCam Perfect हे iOS आणि Android दोन्हीवर युजर्स वापरू शकतात. स्किन स्मूथ करणे , तुमचे हसणे देखील यामध्ये अड्जस्ट करता येते. यामध्ये मॅजिक ब्रश हे फिचर आहे. यामध्ये ऑब्जेक्ट रिमूव्हर असून यामुळे आपल्याला आपले पोट्रेट क्लीन करण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

DeepSelfie

DeepSelfie हे फेस फिल्टर अँप विनोदी आणि मनोरंजक सेल्फी , व्हिडीओ चॅट तयार करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये 3D फेस फिल्टर, फेस स्वॅप, मेकअप टूल्स आणि फोटो एडिटर फिल्टर हे फीचर्स आहेत. फनी मास्क , हिरो मास्क आणि झोंबी फिल्टर्स असे काही वेगळे पर्याय यामध्ये आहेत.