गेल्या वर्षी Elon Musk यांनी ट्विटरची खरेदी केली होती. त्यानंतर मस्क हे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरमध्ये काही ना काही बदल करताना दिसत आहेत. आजपासून ब्ल्यू टिक फक्त ज्यांच्या सब्स्क्रिप्शन असणार आहे त्यांचं वापरता येणार आहेत. यासह अनेक निर्णय मस्क यांनी घेतले आहेत. अलीकडे, ट्विटरने आपले हेटफुल कंडक्ट पॉलिसी शांतपणे बदलली आहे. हेटफुल कंडक्ट पॉलिसी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त भाषण आणि ट्रोलिंगपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करते. ट्रान्सजेंडर समुदायाला डेडनेमिंग आणि मिसजेंडरिंगचे संरक्षण करणारा भाग पॉलिसीमधून काढून टाकण्यात आला आहे. ट्विटरने उचललेले हे पाऊल पाहता ट्विटर आता तृतीयपंथी लोकांसाठी सुरक्षित आहे असणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काय आहे हेटफुल कंडक्ट पॉलिसी ?

जे द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने केले जात आहे किंवा अपमानास्पद आहेत. एखाद्या पोस्टवरून कोणाला टार्गेट केले जात असल्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हेटफुल कंडक्ट पॉलिसी अंतर्गत अशा पोस्टविरुद्ध कारवाई करतात. यापूर्वी ट्विटरच्या द्वेषपूर्ण आचरण धोरणात असे लिहिले होते, ”संरक्षित समुदायाला अपमानित करण्यासाठी किंवा त्यांच्याविरुद्ध नकारात्मक स्टिरियोटाइप तयार करण्याच्या हेतूने वापरण्यात आलेली असभ्य भाषा आणि आम्ही गैरवर्तनांवर बंदी घालतो. तृतीयपंथी समुदायाविरूद्ध मिसजेंडरिंग आणि डेडनेम करणे देखील प्रतिबंधित आहे.”

Maruti Suzuki Brezza SUV
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; खरेदीसाठी मोठी गर्दी, मायलेज २५ किमी, किंमत…
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

हेही वाचा : Apple चे CEO टीम कूक यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले…

आता ट्विटरने या धोरणातून शेवटची ओळ काढून टाकली आहे. ट्विटरने नुकतेच जाहीर केले आहे की अशा प्रकारचे ट्विट, जे हेटफुल कंडक्ट पॉलिसीविरूद्ध ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करतात, त्यांना वार्निंग दिली जाईल. यापूर्वी ट्विटर असे ट्विट साइटवरून काढून टाकत असे. आता आता ट्विटरने डेडनेमिंग आणि मिसजेंडरिंगचे संरक्षण करणारा भाग पॉलिसीमधून काढून टाकल्यामुळे ट्रोलर्सना ट्रोलिंग करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ट्विटरवर आता हेट स्पीचचा महापूर येण्याची शक्यता आहे.

मिसजेंडरिंग म्हणजे काय ?

प्रत्येक व्यक्तीला त्याला काय म्हणायचे आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेलच, अनेक लोक त्यांच्या प्रोफाइलसोबत ती/तिला किंवा तो/त्याला किंवा ते/त्यांना असे लिहितात. याचा अर्थ असा की कोणीतरी त्यांना कसे बोलावावे हे ते ठरवत असतात. असे लिहिण्यामागचा हेतू असा असतो की ज्यांना स्त्री म्हणून ओळख द्यायची आहे त्यांना स्त्री म्हणून संबोधले जावे आणि ज्यांना पुरुष म्हणून ओळखायचे आहे त्यांना पुरुष म्हणून संबोधले जावे.