Twitter Blue: एलॉन मस्कने ट्विटर ब्लू सब्सक्राइबर्स ला आणखी एक भेट दिली आहे. टि्वटरवरील ‘टिवटिवाट’ आता आणखी वाढली आहे. मायक्रोब्लॉगिंगमधील आघाडीच्या टि्वटरवर युजर्स २८० शब्द मर्यादाएवजी १०,००० शब्द लिहू शकतात. युजर्स आता १०,००० अक्षरांपर्यंत ट्विट करू शकतील. आतापर्यंत ही मर्यादा ४००० शब्दांची होती. एलॉन मस्क यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. सध्या, हे अपडेट कंपनीने फक्त यूएस मध्ये उपस्थित असलेल्या वापरकर्त्यांसाठी आणले आहे, जे हळूहळू इतर देशांमध्ये देखील सुरू केले जाईल.

ट्विटचा फॉन्ट बदलविता येणार

ट्विटर ब्लू वापरकर्ते केवळ लांब ट्विट पोस्ट करू शकत नाहीत, तर त्यांच्या ट्विटचा फॉन्ट आणि शैली देखील बदलण्यास सक्षम असतील. म्हणजेच, तुम्ही ट्विट बोल्ड आणि इटॅलिक फॉरमॅटमध्ये पोस्ट करू शकता. कंपनीने हे अपडेट विशेषतः त्यांच्या सदस्यांसाठी लांब आणि आकर्षक पोस्ट लिहिणाऱ्या निर्मात्यांसाठी जारी केले आहे.

What is Sleep Divorce
Sleep Divorce म्हणजे काय? जोडप्यांनी रात्री वेगळं झोपणं कितपत फायदेशीर?
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

(हे ही वाचा : उगाच का Apple कंपनी एवढी मोठी झालीय? सकाळी उठल्यावर CEO करतात ‘हे’ महत्त्वाचं काम, वाचून प्रेमात पडाल )

क्रिएटर्स दीर्घ ट्विटद्वारे पैसे कमवू शकतील

यासह, कंपनीने ट्विटर ब्लू वापरकर्त्यांना सदस्यता मॉडेलसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते कमाई चालू करू शकतील. म्हणजेच, निर्मात्याची इच्छा असल्यास, तो त्याच्या सदस्यत्वासाठी लांब ट्विट आणि व्हिडीओ ठेवू शकतो आणि ज्यांनी सदस्यता घेतली आहे त्यांनाच ही सामग्री प्रथम दिसेल.

एलॉन मस्क यांनी दिली ‘ही’ माहिती

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विट केले की ते त्यांच्या सदस्यांसाठी दर आठवड्याला ‘Ask Me Anything’ सत्र करतील जेथे त्यांचे सदस्य त्यांना प्रश्न विचारण्यास सक्षम असतील. हे सत्र केवळ त्यांच्या सब्सक्राइबर्ससाठी असेल.