Elon Musk हे ट्विटरचे सीईओ आहेत. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने काही बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी केलेल्या अनेक ट्विटमुळे किंवा घेतलेल्या निर्णयांमुळे ते सतत चर्चेत असतात. एलॉन मस्क हे त्यांना टॅग केलेल्या अनेक ट्विट्सना रिप्लाय सुद्धा देत असतात. यावेळी एका ट्विटर वापरकर्त्याने एलॉन मस्क यांच्याकडून रिप्लाय मिळवण्यासाठी AI चॅटजीपीटीची मदत घेतली आहे. चॅटबॉटच्या मदतीने केलेल्या ट्विटला मस्क यांनी देखील दिलेला रिप्लाय काय आहे ते जाणून घेऊयात.

वापरकर्त्याने केला ChatGpt चा वापर

@SamTwits या ट्विटर वापरकर्त्याने ChatGPT ला एक ट्विट तयार करण्यास सांगितले. एक असे ट्विट तयार करण्यास सांगितले की ज्याला एलॉन मस्क हे उत्तर देऊ शकतील किंवा त्यांना हे ट्विट आवडेल. AI ने त्याप्रमाणे ट्विट लिहिले व त्या ट्विटमध्ये रॉकेटशिप इमोजी आणि हॅशटॅग “#SpaceX #Mars #Exploration” असे सुद्धा लिहिले. एका ट्विटर वापरकर्त्याने स्क्रिनशॉट शेअर करताना मस्क यांना टॅग करून ट्विट केले.

हेही वाचा : 6G Network News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा, म्हणाले, “भारत आज …”

मस्क यांनी दिले उत्तर

@SamTwits यांनी AI च्या मदतीने केलेल्या ट्विटला एलॉन मस्क यांनी उत्तर दिले आहे. पण मस्क यांना हे ट्विट फारसे आवडलेले दिसत नाही. मात्र तरीदेखील त्यांनी या ट्विटला उत्तर दिले आहे. उत्तर देताना मस्क म्हणाले की, हा चिन्हांमुळे चुकला. मला हॅशटॅग आवडत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ट्विटला एलॉन मस्क यांच्या उत्तरानंतर अनेक वापरकर्त्यांने सांगितले की, जेव्हा त्यांनी मस्क यांच्या कंपनीपैकी एक असलेल्या SpaceX चा उल्लेख केला तेव्हा त्यांना मस्क यांच्याकडून प्रतिसाद हा मिळणारच होता. त्याशिवाय त्यांनी नमूद केले की, चॅटजीपीटी ने परीक्षा उत्तीर्ण केली कारण शेवटी त्याने केलेल्या ट्विटला ट्एलॉन मस्क यांच्याकडून उत्तर मिळाले आहे. दुसरा वापरकर्ता म्हणाला, “ठीक आहे, वरवर पाहता तसे झाले नाही, कारण तुम्ही उत्तर दिले आहे.”