सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. या कपातीची कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत आहेत. ed-tech स्टार्टअप कंपनी Unacademy नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १२ टक्के म्हणजेच ३८० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

Unacademy चे सीईओ गौरव मुंजाळ यांनी याबाबत आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल केला आहे. या इमेलमध्ये ते म्हणतात की, नफा मिळविण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. दुर्दैवाने कंपनीची सध्याची परिस्थिती पाहता मला आणखी एक कठोर निर्णय घ्यावा लागेल.आम्ही आमच्या कंपनीतील १२ टक्के कर्मचारी कमी करू, ज्यामुळे आम्ही आमचे टार्गेट पूर्ण करू शकू व खर्च कमी करू शकतो असे या इमेलमध्ये म्हणण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोल या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा : Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या वर्षी कंपनीने ऑगस्टमध्ये कर्मचारी कपात केली होती. त्यावेळी कंपनीने १० टक्के म्हणजेच ३५० लोकांची कपात केली होती. मात्र त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना काढणार नाही असे सांगितले होते. त्यादरम्यान कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार देण्यात आला आणि एचआरकडून नोटीस देण्यात आली होती. Unacademy मध्ये कर्मचारी कपातीची ही चौथी फेरी असणार आहे.