Mobile Charging Tips : मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. सकाळी उठण्यासाठी लावलेल्या अलार्मपासून दिवसभरातल्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आपण मोबाईलवर अवलंबुन असतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लगेच संपण्याची शक्यता असते. यासाठी आपल्याला सतत चार्जर आपल्याबरोबर ठेवावा लागतो किंवा इतर कोणाच्याही चार्जरने फोन चार्ज करावा लागतो. पण मोबाईल दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने चार्ज केल्यास मोबाईलची बॅटरी आणि चार्जर दोन्ही खराब होण्याची शक्यता असते. यासाठी मोबाईलबरोबर मिळालेला चार्जर वपारण्याचा सल्ला दिला जातो.

फोन चार्ज करताना जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यामुळे बॅटरी लाईफ वाढण्यास मदत होऊ शकेल. यासाठी ८०-२० हा नियम वापरला जातो. काय आहे हा नियम जाणून घ्या.

आणखी वाचा : फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

प्रत्येक फोनमध्ये एक चार्ज सायकल निश्चित करण्यात आलेली असते. चार्ज सायकल म्हणजे फोनची बॅटरी पुर्ण चार्ज असताना बॅटरी पुर्णपणे संपन्याचा कालावधी. हा कालावधी खूप कमी वेळा वापरला जातो. कारण फोन चार्जिंग संपल्याने सहसा बंद होत नाही, थोडी बॅटरी कमी झाली की आपण तो लगेच चार्जिंगला लावतो. त्यामुळे या सायकलचा वापर होत नाही. याऐवजी ८०-२० नियमाचा वापर करून तुम्ही बॅटरी लाईफ वाढवू शकता.

८० – २० नियम
८०-२० नियम म्हणजे फोनची बॅटरी २० टक्क्यांवर असेल तेव्हाच तो चार्ज करायचा आणि ८० टक्के झाल्यानंतर चार्जिंग बंद करायचे. असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ चांगली राहू शकेल. हा नियम वापरुन बॅटरी लाईफ वाढवता येते. तसेच जर एखादा फोन वापरला जात नसेल तरी त्याची बॅटरी ५० टक्के चार्ज करून ठेवावी, कारण खूप दिवस फोन वापरात नसेल तर त्याची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.