फेसबूक आणि इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय माध्यम आहे. त्यातही फेसबूक युजर्सची संख्या जास्त आहे. फेसबूकही सतत युजर्ससाठी नवनवे फीचर्स लाँच करत असते. फेसबूक अनेकवेळा आपल्याला जुन्या पोस्टची आठवण करून देते, अशा अनेक पोस्ट आपल्याला दिसतात. या पोस्ट्सह आपल्या जवळच्या मित्रमंडळींच्या पोस्ट देखील आपल्याला पाहायच्या असतात. पण फेसबूक फीडवर कधीकधी बऱ्याच अनावश्यक पोस्ट दिसतात. या अनावश्यक पोस्टमुळे बरेच जण त्रस्त असतात. या अनावश्यक पोस्ट्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही एक सोप्पी ट्रिक वापरू शकता.

फेसबूकवरील काही सेटिंग्स बदलुन तुम्ही काही पोस्ट तात्पुरत्या किंवा कायमच्या हाईड म्हणजेच लपवू शकता. ही ट्रिक वापरून तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पेजला अनफॉलो न करता त्यांच्या पोस्ट्स फीडवर येण्यापासून थांबवू शकता.

आणखी वाचा : ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

अनावश्यक फेसबूक पोस्ट्सपासून अशी मिळवा सुटका

  • सर्वात आधी तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये साइन इन करा.
  • त्यानंतर पोस्टच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा ज्या पोस्टपासून सुटका हवी आहे.
  • त्यानंतर तुम्हाला अनेक पर्यायांची यादी दिसेल.
  • तुम्हाला फक्त तीच पोस्ट लपवायची असेल तर Hide Post या पर्यायावर क्लिक करा.
  • जर तुम्हाला त्या व्यक्तीची किंवा त्या पेजची पोस्ट तात्पुरती लपवायची असेल, तर ३० दिवसांसाठी स्नूझ वर क्लिक करा. आणि, जर तुम्हाला पोस्ट कायमस्वरूपी लपवायच्या असतील, तर तुम्ही अनफॉलो करू शकता.
  • जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या किंवा पेजच्या पोस्टला प्राधान्य द्यायचे असेल, तर तुम्ही फेवरेट हा पर्याय निवडू शकता. या फीचरमुळे निवडलेल्या व्यक्ती किंवा पेजवरील पोस्टला प्राधान्य दिले जाईल आणि त्यांच्या अधिक पोस्ट तुमच्या फीडवर दिसतील.