scorecardresearch

व्होडाफोन आयडियाचे नवीन वाय-फाय डिव्हाइस, कोणत्याही ठिकाणी मिळेल सुपरफास्ट इंटरनेट

व्होडाफोन आयडियाने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी Vi MiFi पोर्टेबल ४जी वाय-फाय राउटर लॉंच केले आहे. Vi MiFi या राउटरबद्दल, असा दावा केला जातो की याद्वारे १५०Mbps पर्यंतचा वेग मिळेल.

वापरकर्ते एकाच वेळी १० उपकरणे कनेक्ट करून वाय-फाय वापरण्यास सक्षम असतील. (photo credit: indian express)

व्होडाफोन आयडियाने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी Vi MiFi पोर्टेबल ४जी वाय-फाय राउटर लॉंच केले आहे. Vi MiFi या राउटरबद्दल, असा दावा केला जातो की याद्वारे १५०Mbps पर्यंतचा वेग मिळेल. या पोर्टेबल राउटरसह, वापरकर्ते एकाच वेळी १० उपकरणे कनेक्ट करून वाय-फाय वापरण्यास सक्षम असतील. व्होडाफोन आयडियाचे म्हणणे आहे की, हा राउटर टीव्हीवरून स्मार्ट डिव्हाइसशी कनेक्ट करता येणार आहे. या प्रकारचे राउटर एअरटेल आणि जिओकडेही आहे.

Vi MiFi किंमत आणि स्पेसिफिकेशन

Vi MiFi राऊटरची किंमत २००० रुपये आहे आणि हे राउटर व्होडाफोनच्या पोस्टपेड प्लॅनसह खरेदी केली जाऊ शकते. हे सध्या देशातील ६० शहरांमधील ग्राहकांसाठी ३९९ रुपयांच्या प्रारंभिक पोस्टपेड प्लॅनसह उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिओच्या JioFi JMR५४० राउटरची किंमत १,९९९ रुपये आहे, जी कोणत्याही परताव्याच्या अटींशिवाय अनेक पोस्टपेड योजनांसह उपलब्ध आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर त्याची रचना पॉकेट फ्रेंडली आहे. त्याची कमाल गती १५० Mbps आहे. वापरकर्ते या राउटरशी लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि आयओटी डिव्हाइस कनेक्ट करू शकतील. याला २७००mAh बॅटरी पॉवर देण्यात आली आहे ज्याचा दावा पाच तासांचा बॅकअप आहे. तसेच हे राउटर १ वर्षाच्या वॉरंटीसह येते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vi mifi portable 4g wireless router for postpaid users launched in india scsm