Valentine’s Day Offers : दरवर्षी ७ ते १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. यादरम्यान विविध कंपन्या ग्राहकांसाठी व्हॅलेंटाईन डेनिमित्त खास ऑफर्स घेऊन येत असतात. रिअल मी, ॲपलनंतर विजय सेल्स कंपनीसुद्धा व्हॅलेंटाईन डेनिमित्त टेक वस्तूंवर आकर्षक सूट देत आहे. त्यामध्ये स्मार्ट फोन्स, गॅझेट्स, ऑडिओ उपकरणे आदी गोष्टींवर खास ऑफर असणार आहे.

तर विजय सेल्समध्ये कोणत्या उपकरणांवर किती सूट आहे ते पाहू…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

विजय सेल्समध्ये ६,६९९ रुपयांपासूनच्या मोबाईल फोन्सवर ऑफर, ४० टक्क्यांपर्यंत टॅबलेटवर सूट, १४९ रुपयांपासून सुरू असणारी ऑडिओ उपकरणे आणि ८९९ रुपयांपासून सुरू होणारे स्मार्ट वॉच, आकर्षक फिलिप्स उपकरणे, वेगा मल्टी ग्रूमिंग किट आणि आकर्षक फिलिप्स १००० वॉट हेअर ड्रायर ५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही अनेक वस्तू खरेदी करू शकणार आहात.

या सेलमध्ये रेडमी १३सी ५जी स्मार्ट फोनची किंमत १०,९९९ रुपये आहे. तसेच ॲपल आयपॅड 9th जनरेशन एचडीएफसी बँकच्या इन्स्टंट डिस्काउंटसह २७,९०० रुपयांपर्यंत मिळणार आहे. गेम खेळण्याची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी या सेलमध्ये असूस रॉग६ ५जी (Asus Mobile ROG 6 5G) हा गेमिंग फोन ४७,९९९ रुपयांना उपलब्ध असेल; ज्याची मूळ किंमत ७७,९९९ रुपये अशी आहे.

ऑडिओफाइल बोट रॉकेरझ ५५१ एएनसी (BoAt Rockerz 551 ANC) हेडफोन्स फक्त २,७९९ रुपयांमध्ये तुम्ही या सेलमध्ये खरेदी करू शकणार आहात. रेडमी बड्स ४ (Redmi Buds 4) फक्त ९९९ रुपये, ६,२५० रुपयांत सारेगामा कारवान हिंदी म्युझिक प्लेअर, जेबीएल सिनेमा एसबी१४० व त्याचे ११० डब्ल्यू आउटपुट ९,९९९ रुपयांना या सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. २९,९०० रुपयांना जेबीएल पार्टी बॉक्स ११० पोर्टेबल स्पीकर किंवा boAtAavante Bar Quake 2.1 ८,९९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध असेल. तर पॉवर बँकसारख्या मोबाईल ॲसेसरीजची किंमत फक्त ३४९ रुपयांपासून सुरू होईल.

हेही वाचा…Asus ने लाँच केला ‘हा’ स्वस्त लॅपटॉप; १५ तासांच्या बॅटरी लाइफसह मिळणार सबस्क्रिप्शन

सेलमध्ये फिलिप्सचे वनब्लेड ट्रीमर १,१९९ रुपयांना आणि फिलिप्स १००० बॉडी ट्रीमर १,१२९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. तर स्वयंपाकघरातील उपकरणे सेलमध्ये कॉफी मेकर आणि फिलिप्स एअरफ्रायर ४,९९९ रुपये व ११,९९९ रुपयांना उपलब्ध आहेत.

तसेच महिलांना येथे ३,१९९ रुपयांना निग्मा आर३२ स्टायलिश स्मार्ट वॉच खरेदी करता येणार आहे. महिलांसाठी वेगा ३००० सीरिज ऑल इन वन हेअर स्टायलर या सेलमध्ये १,४५१ रुपयांना आणि ३००० सीरिज हेअर ड्रायर १,७८९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. तसेच फोटोग्राफीची आवड असणारे अनेक ग्राहक इन्स्टाक्स (Fujifilm Instax) ५,४९९ रुपयांना या सेलमध्ये खरेदी करू शकणार आहेत.

लॅपटॉप डीलमध्ये ॲपल मॅकबुक एअर एम१ ८जीबी रॅम मॉडेल ८०,९९० रुपये, एचपी १५एस लॅपटॉप 12th जेन इंटेल आय३ प्रोसेसर ३९,९९० रुपयांना सेलमध्ये उपलब्ध असेल; तर प्ले स्टेशन ५ साठी सोनी ड्युअल सेन्स वायरलेस कंट्रोलर ५,७९० रुपयांमध्ये मिळेल. अशा अनेक वस्तू ग्राहक या सेलमध्ये खरेदी करू शकणार आहेत.

Story img Loader