विवो भारतीय बाजारात लवकरच टी सीरिजचे फोन विक्रीसाठी आणणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचे फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. त्यामुळे या सीरिजमधील Vivo T1 आणि Vivo T1X या फोनची जोरदार चर्चा आहे. तसेच हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होईल, असं सांगण्यात येत आहे. विवो टी1 हा फोन भारतात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ एसओसीसह लॉन्च होण्याची शक्यता असून त्याची किंमत २० हजारांच्या आत असणार आहे. हा फोन ५ जी कनेक्टिविटीला सपोर्ट करणारा असणार आहे. विवो टी 1 हा फोन चीनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७९जी प्रोसेसरसह लॉन्च केला आहे. मात्र भारतात हा फोन स्नॅपड्रॅन ६९५ एसओसीसह लॉन्च केला जाईल. हा फोन कधी लॉन्च होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

चीनमध्ये विवो टी 1 मध्ये ६.६७ इंच फुल-एचडी+ (१०८० x २४०० पिक्सेल) डिस्प्ले २०:९ गुणोत्तर, १२० एचझेड रिफ्रेश दर आणि २४० एचझेड टच सॅम्पलिंग रेटपर्यंत आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम आहे. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. समोरच्या बाजूला १६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. फोन ४४ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी पॅक आहे. १२८ जीबी स्टोरेजसह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह ८ जीबी रॅम या दोन कॉन्फिगरेशनसह आहेत. विवोचे ऑफलाइन मार्केटमध्ये मजबूत अस्तित्व कायम आहे. मात्र ऑनलाइन गेमिंग श्रेणीमध्ये Xiaomi, Realme आणि इतरांचे वर्चस्व आहे.

knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
Xiaomi Company 14 Series in India launch on March seven Five things about the phone You Must Know Before Buy
Xiaomi चा स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच; खरेदीपूर्वी ‘या’ पाच गोष्टी जाणून घ्या…
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेलाय? CEIR वर असं करू शकता ब्लॉक; काय असतं KYM? जाणून घ्या

विवो T सीरिज भारतातील विद्यमान Y लाइन-अपची जागा घेईल अशी शक्यता आहे. विवो Y मालिकेचा भाग म्हणून आपले बजेट स्मार्टफोन लॉन्च करते. V मालिका मध्य-श्रेणी श्रेणीत आहे. तर X मालिका फ्लॅगशिप फोन ऑफर करते. विवो भारताच्या ऑनलाइन गेमिंग स्मार्टफोन मार्केटला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची ही पहिली वेळ नाही. २०१९ मध्ये, विवोने Z सीरिज सादर केली होती. यात विवो Z1 Pro आणि Z1X यांचा समावेश होता. या दोन्ही फोनने कमी बजेटमध्ये चांगली ऑनलाइन गेमिंग कामगिरी प्रदान करण्याचा दावा केला होता. मात्र, नंतर ही सीरिज बंद करण्यात आली.